मालेगावी दहशत माजविणारे आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:25 AM2019-02-12T00:25:03+5:302019-02-12T00:25:35+5:30
मालेगाव शहरातील आयेशानगर, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणाºया पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मालेगाव मध्य : शहरातील आयेशानगर, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणाºया पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात १४ जणांना अटक करण्यात आली, तर दोनजण अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी दिली.
१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात धारदार शस्त्रांच्या जोरांवर धुडगूस घालून तीन जणांना गंभीर जखमी करणाºया टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातील आझामगड जिल्ह्यातून मुख्य संशयितांसह पाच जणांना, तर भिवंडी, मालेगाव येथून एकूण १६ जणांना ताब्यात घेण्यात आले. १४ संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच संशयितांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोन अल्पवयीन युवकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, या टोळीकडून चार दुचाकी, शस्त्रे जप्त करण्यात आली.
१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील जाफरनगर, नवीन वस्ती, मिल्लतनगर, आयेशानगर भागात तोंडाला कापड बांधून दुचाकीवर येत हातात तलवारी, कुºहाड, कोयता, चाकू व लाकडी दांडे घेऊन धुडगूस घालीत तीन जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पोबारा केला होता. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शक सूचना देत संशयितांच्या शोधार्थ तपास पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातून अटक
पवारवाडीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने ६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील आझामगड जिल्ह्यातील सयारमिर येथून संशयित जमालुद्दीन कमालुद्दीन कुरेशी (आरीफ कुरेशी) (२२), मोहंमद अकराम मोहंमद सुलेमान (१९) (मथन चोरवा), सऊद अहमद फय्याज अहमद (२३) उर्फ सउद चोरवा, शोएब खान फिरोज खान (२१), एजाज अहमद अब्दुल समद (२०) यांना अटक केली. आझामगड न्यायालयात उभे केले असता त्यांना ट्रॉन्झिस्ट रिमांडवर घेण्यात आले.