जायखेडा :जिलेटिन, डिटोनेटरचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:02 AM2019-03-18T02:02:15+5:302019-03-18T02:02:28+5:30
बागलाण तालुक्याजवळच्या महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीवर सुरू असलेल्या नाकेबंदी दरम्यान जिलेटिन व डिटोनेटरचा मोठा साठा जप्त करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पिकअप गाडी व तीन लाख पस्तीस हजार शंभर रुपये किमतीच्या स्फोटकांसह एका आरोपीस ताब्यात घेतले
जायखेडा : बागलाण तालुक्याजवळच्या महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीवर सुरू असलेल्या नाकेबंदी दरम्यान जिलेटिन व डिटोनेटरचा मोठा साठा जप्त करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पिकअप गाडी व तीन लाख पस्तीस हजार शंभर रुपये किमतीच्या स्फोटकांसह एका आरोपीस ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून गुजरातकडे स्फोटके घेऊन जाण्याचा आरोपींचा काय उद्देश होता, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून पिकअप गाडी थांबवून तपासणी सुरुवात केली असता गाडीत बसलेला एक इसम अचानक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
यावेळी चालकाला तातडीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानेही उडवाउडवीची
देण्यास सुरु वात केल्याने पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पिकअपची कसून तपसणी केली. या वाहनात तब्बल २१५० जिलेटिनच्या कांड्या व १७५० डिटोनेटरचे नग आढळून आले.
या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी विनापरवाना स्फोटके बाळगल्याप्रकरणी व मानवी जिवास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी भारतीय स्फोटक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पिकअपचालक भवरलाल शंभूलाल गुर्जर, रा. करणीपाडा, पंचायत छतरपुरा, ता. आसीन, जि. भिलवाडा, राजस्थान याला अटक केली असून, याचा दुसरा साथीदार बुधलाल तुलसीराम गुजर रा. राजस्थान हा फरार असून, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, एएसआय सोनवणे, पो. ना. पाटील, थैल, वाघ, पो. शि. माळी हे तपास करीत आहेत.
चिचली घाट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना कोम्बिंग आॅपरेशन राबवून सतर्कराहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलिसांकडून मुल्हेरजवळच्या महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील चिचली घाट येथे रात्री नाकाबंदी सुरु असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या पथकाला मुल्हेरकडून गुजरातकडे महेंद्रा कंपनीचे पिकअप क्र मांक आरजे ०६ जीसी २१८५ ही वेगाने पळून जाताना आढळली.