...यंदा उष्माघाताचे बळी शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:56+5:302021-05-19T04:14:56+5:30

चालू वर्षी एप्रिलमध्ये नाशिककरांना उन्हाचा तडाखा जाणवला होता. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे एप्रिल महिना चांगलाच तापदायक ठरला होता. या हंगामात ...

... zero heatstroke victims this year! | ...यंदा उष्माघाताचे बळी शून्य!

...यंदा उष्माघाताचे बळी शून्य!

Next

चालू वर्षी एप्रिलमध्ये नाशिककरांना उन्हाचा तडाखा जाणवला होता. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे एप्रिल महिना चांगलाच तापदायक ठरला होता. या हंगामात ३९.८ इतक्या कमाल तापमानाची उच्चांकी नोंद २७ एप्रिल रोजी पेठ रोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे. यापेक्षापुढे अद्याप कमाल तापमानाचा पारा सरकलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मे महिना उजाडल्यानंतर कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार करेल असे वाटत होते; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने आपले रूप बदलले आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन अवकाळी पावसानेही हजेरी लावली. त्यानंतर चक्रीवादळाने वर्दी दिली. या सर्वांचा परिणाम शहराच्या हवामानावर झालेला दिसून येतो. या वर्षी उष्णतेची लाट फारशी तीव्रतेने नागरिकांना जाणवली नाही. या वर्षी उष्माघाताने बळी जाण्याची घटना घडली नाही.

--इन्फो--

उन्हाळा घरातच...!

कोरोनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे या वर्षी उन्हाळा नागरिकांना घरातच बसून काढावा लागला. चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कडक लॉकडाऊनही घोषित करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारकडूनही लॉकडाऊनला ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे बहुसंख्य नागरिक एप्रिलपासून आतापर्यंत घरातच राहत असल्याने उन्हाचा चटका लागण्याचा फारसा प्रश्नच निर्माण झाला नाही.

--इन्फो---

असा राहिला शहरातील उन्हाळा

एप्रिलच्या पहिल्या दिवशी शहरात ३५.१ इतके कमाल तापमान नोंदविले गेले हाेते; मात्र तीनच दिवसांत तापमानाचा पारा ३८ अंशांवर पोहोचला होता. ६ एप्रिल रोजी ३९.२ अंश इतके तापमान नोंदविले गेले होते. पंधरवड्यानंतर शहराचे किमान तापमानही वाढण्यास सुरुवात झाली होती. यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा जाणवत होता. किमान तापमानाचा पारा २२.९ अंशांपर्यंत पोहोचला होता. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३८.९ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. सध्या कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या जवळपास स्थिरावला आहे.

--आलेख--

मागील चार वर्षांतील उच्चांकी तापमान

२०१७- १४ एप्रिल रोजी-४१.०

२०१८- २७ एप्रिल रोजी- ४०.५

२०१९- १४ एप्रिल रोजी ४०.५

२०२० - १५ एप्रिल रोजी ४०.५

२०२१- २७ एप्रिल रोजी ३९.८

---

फोटो : आर वर डमी फॉरमेट आर वर १८स्टार ७२६ नावाने

१८सन१ / १८आयटम/ १८सन२ नावाने फोटो सेव्ह.

Web Title: ... zero heatstroke victims this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.