उपाययोजना शुन्य : संपुर्ण वडाळा गाव ‘सील’ केल्याने लोकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:20 PM2020-06-05T16:20:49+5:302020-06-05T16:22:22+5:30

मनपा प्रशासनाकडून केंद्रातून नागरिकांना कुठल्याही प्रकारची वैद्यकिय सेवा पुरविली जात नसल्याने मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Zero solution: Dissatisfaction among the people as the entire Wadala village has been 'sealed' | उपाययोजना शुन्य : संपुर्ण वडाळा गाव ‘सील’ केल्याने लोकांमध्ये नाराजी

उपाययोजना शुन्य : संपुर्ण वडाळा गाव ‘सील’ केल्याने लोकांमध्ये नाराजी

Next
ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्याविक्रीवरही प्रतिबंधपालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना निवेदन

नाशिक : वडाळागावातील काही ठराविक भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संपुर्ण गावच मनपा प्रशासनाने ‘सील’ केले आहे, तर दुसरीकडे मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा स्थितीतसुध्दा अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. हे केंद्र केवळ नावापुरतेच उरले असल्याचे बोलले जात आहे.
शंभर फुटी रस्त्यालगत घरकुल इमारतींशेजारी मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याला लागून असलेल्या मुमताजनगर, महेबुबनगर, सादिकनगर, गुलशननगर या दाट लोकवस्तीच्या भागात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रूग्ण आढळून आले आहे. तरीदेखील मनपा प्रशासनाकडून केंद्रातून नागरिकांना कुठल्याही प्रकारची वैद्यकिय सेवा पुरविली जात नसल्याने मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
तसेच मागील तीन दिवसांपासून संपुर्ण वडाळागाव सील करण्यात आले असून प्रतिबंधित क्षेत्र मनपा आरोग्य विभागाने घोषित केले आहे. एकीकडे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले गेले असताना दुसरीकडे नागरिकांना त्यादृष्टीने पुरक असलेल्या उपाययोजना करण्यामध्ये मात्र मनपा प्रशासनाला अपयश आले. मुख्य गावठाण भागातील खरेदी-विक्रीचे मुख्य ठिकाण समजल्या जाणा-या खंडोबा चौकाच्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. भाजीपाला विक्री, किराणा दुकानेसुध्दा सुरू करण्याची परवानगी नसल्यामुळे नागरिकांनी लोकांनी नेमके खायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.


‘कन्टेंन्मेंट झोन’चा फेरविचार व्हावा
ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे तो सर्व परिसर शंभरफूटी रस्त्याच्या पलिकडे गावाच्या दक्षिणेला आहे. तो संपुर्ण भाग मनपा प्रशासनाने ‘कन्टेमेंट झोन’ करायला हरकत नाही; मात्र संपुर्ण गाव ‘लॉकडाऊन’ करून गावाबाहेर जाण्यास सगळ्यांना मज्जाव करणे चुकीचे आहे. यामुळे या ‘कन्टेंन्मेंट झोन’बाबत फेरविचार करण्याची मागणी वडाळागावातील नागरिकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. आॅनलाईन पाठविलेल्या निवेदनावर मुख्य गावठाण भागातील नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.
 

Web Title: Zero solution: Dissatisfaction among the people as the entire Wadala village has been 'sealed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.