जिल्हा परिषदेत गिते पुन्हा होणार सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:42 AM2018-03-20T01:42:59+5:302018-03-20T01:42:59+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे मंगळवार दि. २० रोजी जिल्हा परिषदेत पुन्हा रुजू होणार आहेत. गिते आल्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होण्याची शक्यता असून, मार्चएण्ड संदर्भात गिते आढावा घेण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली आहे. गिते हे बिहार राज्यातील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. आता निवडणुकीनंतर ते पुन्हा जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळणार आहेत.
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे मंगळवार दि. २० रोजी जिल्हा परिषदेत पुन्हा रुजू होणार आहेत. गिते आल्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होण्याची शक्यता असून, मार्चएण्ड संदर्भात गिते आढावा घेण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली आहे. गिते हे बिहार राज्यातील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. आता निवडणु-कीनंतर ते पुन्हा जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यापासून गिते यांना अनेकविध कारणांवरून जिल्हा परिषदेत कामकाजाला पुरेसा वेळ मिळालेला नाही. पदभार घेतल्यानंतर दीर्घ रेजेवर गेलेले गिते परतल्यानंतर त्यांनी धडक कामकाजाला सुरुवात केली होती. अधिकाºयांच्या बैठका, फाईल्सचा निपटारा करण्यावर त्यांनी भर देतानाच कर्मचारी, अधिकाºयांच्या वक्तशीरपणाकडेदेखील त्यांनी लक्ष दिले होते. परंतु ऐनवेळी बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याने गिते यांना बिहारला जावे लागले. तेथूनही त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे अधिकाºयांशी संवाद साधला होता. गिते यांच्या अनुपस्थितीतच जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभाही पार पडली होती. आता गिते पुन्हा खुर्ची सांगाळणार असल्याने त्यांच्या कामगिरीकडे पुन्हा लक्ष लागले आहे.