आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्हा परिषद आली चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:04 AM2021-06-26T00:04:21+5:302021-06-26T00:06:18+5:30

जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आली असतानाच आता सदस्य व पदाधिकाऱ्यांनाही आपल्या मतदार संघातील कामांची आठवण होऊ लागली असून, त्यातूनच नवीन कामांच्या निविदांचा प्रश्न उपस्थित करून मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी सारेच प्रयत्नशील झाले आहेत. मात्र मर्जीतील काम न मिळाल्यास त्यातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशाच एका कामांवरून माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाची तक्रार केली आहे.   

The Zilla Parishad came under discussion after a round of allegations | आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्हा परिषद आली चर्चेत

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्हा परिषद आली चर्चेत

Next
ठळक मुद्देकामे, निविदांचे निमित्त : माजी सभापतींचा लेटरबॉम्ब

नाशिक : जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आली असतानाच आता सदस्य व पदाधिकाऱ्यांनाही आपल्या मतदार संघातील कामांची आठवण होऊ लागली असून, त्यातूनच नवीन कामांच्या निविदांचा प्रश्न उपस्थित करून मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी सारेच प्रयत्नशील झाले आहेत. मात्र मर्जीतील काम न मिळाल्यास त्यातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशाच एका कामांवरून माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाची तक्रार केली आहे.   
जिल्हा परिषदेत अलीकडेच काम वाटप समितीने केलेले काम वाटपाबाबत भिन्न मतप्रवाह व्यक्त केले जात असून, प्रशासनाने ही सारी प्रक्रिया पारदर्शी राबविल्याचा दावा केलेला असताना काही सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मात्र तीव्र आक्षेप व्यक्त केले आहेत. ठेकेदारांनी प्रशासन व जिल्हा परिषद सदस्यांवर नाराजी व्यक्त केली असली तरी सदस्याच्या मते काही विशिष्ट ठेकेदारांची मक्तेदारी  संपुष्टात आणण्यासाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया योग्यच असल्याचे म्हटले आहे.  
मजूर संस्थांनीदेखील  प्रशासनाच्या काम वाटपावर समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे एकूणच काम वाटपाची बाब पहिल्यांदाच जिल्हा  परिषदेच्या इतिहासात चर्चेची झाली असतानाच त्यातच माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मालेगाव तालुक्यातील काही कामांच्या निविदांचा प्रश्न उपस्थित करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. संजय वाघ नामक ठेकेदाराने बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा भरल्याचा त्यांचा आरोप असला तरी, त्याची प्रशासनामार्फत चौकशी केली जात असून तशी कल्पना पवार यांना देण्यात आली आहे. 
मात्र आता त्यांनी मालेगाव तालुक्यातील सुमारे दीड कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा न उघडण्याचा आग्रह धरला आहे. संबंधित वाघ ठेकेदाराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी हितसंबंध असल्याचा आरोप पवार यांनी केला असून,  त्यात त्यांनी काही गंभीर तक्रारही करून काम वाटप समितीचे अध्यक्षपदावरून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दूर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. 
 

Web Title: The Zilla Parishad came under discussion after a round of allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.