जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांचे आदेश तांदूळवाडी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:27 AM2018-05-11T01:27:53+5:302018-05-11T01:27:53+5:30
नाशिक : नांदगाव तालुक्यात विशेष पथकाद्वारे केलेल्या पाहणीत कर्तव्यात कसूर आणि कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने तांदूळवाडी येथील ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
नाशिक : नांदगाव तालुक्यात विशेष पथकाद्वारे केलेल्या पाहणीत कर्तव्यात कसूर आणि कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने तांदूळवाडी येथील ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. पाणीपुरवठा योजनेचे दप्तर हस्तांतर होऊनही याबाबत खोटी माहिती दिल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायतीमधून बदली होऊनही पाणीपुरवठा योजनांचे दप्तर हस्तांतर न करणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ. गिते यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया सर्व योजनांचा व प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी नांदगाव तालुक्याची आढावा बैठक तहसील कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला गोपनीय पथकांनी तपासलेल्या शासकीय कार्यालयांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नागापूर येथील अंगणवाडी गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. तसेच गरम आहार वाटप नसल्याचे, हजेरी रजिस्टर भरलेले नसल्याचे, मागील गरम आहार नमुन्यात अळ्या व बुरशी असल्याचे, पाण्याच्या ड्रममध्ये मुंग्या असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले. याबाबत अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकेस जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. हिसवळ (खु.) क्र मांक २ च्या अंगणवाडीमध्येही काही बाबतीत अनिमितता आढळून आल्याने पर्यवेक्षिकेस नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. तांदूळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे दप्तर हस्तांतर होऊनही याबाबत खोटी माहिती देणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पवन वाघ यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीपूर्वी विशेष पथकांद्वारे तालुक्यातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र यांची गोपनीय तपासणी करण्यात आली. यात नागापूर ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी क्रमांक १ गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचे व कामकाजात गंभीर चुका आढळून आल्याने अंगणवाडीतील सेविकेस सेवेतून काढण्याचे तसेच पर्यवेक्षिकेची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश दिले.