जिल्हा परिषद : सुकदेव बनकरांचा वावरही खूपतोय मीणांना खटकतोय झगडे यांचा हस्तक्षेप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:56 AM2018-02-05T00:56:15+5:302018-02-05T00:57:28+5:30

नाशिक : आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेली झाडाझडती आणि बनकर यांनी केलेली दप्तर तपासणी दीपककुमार मीणा आणि त्यांच्या समर्थकांना खटकली असल्यानेच पक्षपातीपणाचा आरोप होत आहे.

Zilla Parishad: Do the interference of the Sukdev bunga beating the media too long? | जिल्हा परिषद : सुकदेव बनकरांचा वावरही खूपतोय मीणांना खटकतोय झगडे यांचा हस्तक्षेप?

जिल्हा परिषद : सुकदेव बनकरांचा वावरही खूपतोय मीणांना खटकतोय झगडे यांचा हस्तक्षेप?

Next
ठळक मुद्देपाठीशी घालत असल्याचा आरोपआमदाराशी निर्माण केलेली जवळिक

नाशिक : विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेली झाडाझडती आणि उपायुक्त सुकदेव बनकर यांनी जिल्हा परिषदेत केलेली दप्तर तपासणी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा आणि त्यांच्या समर्थकांना खटकली असल्यानेच आता या दोघांवर पक्षपातीपणाचा आरोप होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. खुलेपणाने याबाबत स्पष्ट कुणीही बोलत नसले तरी मीणा यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी झगडे काही अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप एका संघटनेने केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत असलेला मीणा वाद आता आयएएस अधिकाºयांमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या कारवायांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, त्यात अधिकाºयांपासून आमदारासारखे दिग्गज लोकही भरडले गेले आहेत. मीणा उघडपणाने कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे त्यांची मूळ भूमिका समोर येऊ शकलेली नाही. आदिवासी आमदारांशी त्यांची झालेली चर्चा, विभागीय आयुक्तांबरोबरच्या बैठका, ग्रामसेवकांसंदर्भातील बदलेली भूमिका आणि शहरातील एका आमदाराशी निर्माण केलेली जवळिक यामुळे मीणा यांचे मनसुबे अद्यापही उघड झालेले नाहीत. मात्र केवळ त्यांच्या नावाभोवतीच जिल्ह्णातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातून नेमके त्यांना काय साध्य करायचे आहे याचा उलगडा मात्र अजूनही होत नाही. मीणा हे आदिवासी भागासाठी चांगले काम करीत असल्याने त्यांना रोखण्यासाठी ग्रामसेवकांनी असहकार पुकारल्याचा आरोप करीत आदिवासी कोळी महादेव विकास संघटनेने ग्रामसेवकांना उघड आव्हान दिले होते. दुसरीकडे मीणा यांनी ग्रामसेवकांशी जुळवून त्यांच्या विरोधातील आंदोलनाची धार कमी करण्यात यश मिळविले आहे. आता तर आदिवासी संघटनेने तर विभागीय आयुक्त महेश झगडे आणि उपायुक्त सुखदेव बनकर यांच्या चौकशीची मागणी करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र धाडले असतानाही मीणा यांनी आपल्याच अधिकाºयांविरोधातील पत्रव्यवहारावर सोयीस्कर मौन बाळगल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वास्तविक मीणा यांच्या प्रकरणावरूनच झगडे, बनकर यांना या वादात ओढले जात असल्याचे स्पष्ट दिसत असताना मीणा यांनी मात्र हा समज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मीणा यांना नेमके हवे तरी काय? हा प्रश्न येथील अधिकाºयांना अस्वस्थ करीत आहे.
अधिकाºयांवर नजर
जिल्हा परिषदेतील काही अधिकारी बनकर यांच्या काळात रिजेक्ट झालेल्या फाइल्स मीणा यांच्याकडून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा मीणा यांंना संशय असल्यानेच अधिकारी आणि मीणा यांच्यातील दुरावा वाढत असल्याची चर्चा आहे. आदिवासी कोळी संघटनेच्या निवेदनावरून तरी या गोष्टीला दुजोरा मिळाल्यासारखाच आहे. मीणा हे आदिवासींसाठी उपाययोजना राबवित असल्यानेच त्यांच्याविरोधात शासकीय यंत्रणा गेल्याचा आरोप खासगीत केला जात आहे, तर मीणा यांचे मौनही सूचक मानले जात आहे.

Web Title: Zilla Parishad: Do the interference of the Sukdev bunga beating the media too long?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.