जिल्हा परिषद गट-गण आरक्षणाची आज सोडत
By Admin | Published: October 5, 2016 12:44 AM2016-10-05T00:44:42+5:302016-10-05T00:47:51+5:30
नियोजन भवनात बैठक : राजकीय भवितव्य ठरणार
नाशिक : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या जागांची आरक्षणाची सोडत पद्धत व चक्रानुक्रम बुधवारी (दि.५) सकाळी ११ वाजता प्रत्येक तहसील व प्रांत कार्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोडत काढण्यात येईल.
जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम(१), कलम ५८(१) (अ) प्रमाणे व जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम निवडणूक विभाग व निर्वाचण गण प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत (लॉटरी) पद्धतीने काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण बुधवारी सकाळी ११ वाजता नियोजन भवनात होईल. नियोजन भवनातच दुपारी १२ वाजता नाशिक तालुका पंचायत समितीच्या आठ गणांची सोडत काढण्यात येईल. प्रत्येक तालुकानिहाय पंचायत समिती गणांची सोडत पुढील ठिकाणी होईल. सर्व गणांची सोडत सकाळी ११ वाजता काढण्यात येईल. पंचायत समिती बागलाण-पंचायत समिती बागलाण सभागृह, पंचायत समिती मालेगाव- प्रांत कार्यालय मालेगाव, पंचायत समिती नांदगाव- तहसील कार्यालय सभागृह, नांदगाव, पंचायत समिती येवला-तहसील कार्यालय सभागृह,येवला, पंचायत समिती चांदवड- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह,चांदवड, पंचायत समिती देवळा- पंचायत समिती सभागृह देवळा, पंचायत समिती कळवण- पंचायत समिती सभागृह- कळवण, पंचायत समिती सुरगाणा- तहसील कार्यालय सभागृह,सुरगाणा, पंचायत समिती दिंडोरी- तहसील कार्यालय सभागृह - दिंडोरी, पंचायत समिती निफाड- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन सभागृह - निफाड, पंचायत समिती इगतपुरी- पंचायत समिती सभागृह, इगतपुरी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर- तहसील सभागृह, त्र्यंबकेश्वर, पंचायत समिती सिन्नर- तहसील कार्यालय सभागृह, सिन्नर, पंचायत समिती पेठ - पंचायत समिती सभागृह - पेठ यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
थेट नगराध्यक्ष आरक्षण सोडतत्र्यंबकेश्वर : नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीची शहरवासीयांना उत्सुकता लागून राहिली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईमध्ये आरक्षण जाहीर होणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात तिसऱ्यांदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यापुर्वी भारतीय जनता पक्षाच्या पुष्पाताई झोले या सन २००२-०३ या वर्षी थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. दरम्यान, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरूरे आणि नगराध्यक्ष विजय लढ्ढा मुंबई येथे रवाना झाल्या आहेत. दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वरसह नाशिकमधील बहुतांश गट हे आरक्षित होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेतील विद्यमान मातब्बर नेत्यांना गटाची शोधाशोध करावी लागणार आहे. विद्यमान अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती शोभा डोखळे, माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, गटनेते रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, प्रशांत देवरे, संदीप पाटील यांच्यासह संदीप गुळवे, गोरख बोडके, यतिन पगार, चंद्रकांत वाघ आदिंचे गट आरक्षित होण्याची शक्यता आहे.