जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:59 PM2018-02-03T23:59:25+5:302018-02-04T00:24:49+5:30
नाशिक : वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी इतर आमदारांना डावलून आमदार बाळासाहेब सानप यांचा दरबार गाठला असला तरी मीणा यांचे समर्थन करीत काही जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नाशिक : वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी इतर आमदारांना डावलून आमदार बाळासाहेब सानप यांचा दरबार गाठला असला तरी मीणा यांचे समर्थन करीत काही जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ग्रामसेवक आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांमध्ये ‘समझोता’ झाला असतानाही मीणा समर्थकांनी चौकशीची मागणी करीत मंत्रालय गाठले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हाधिकारी तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून आपल्या विरोधातील बंड शमविण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखविला असताना आदिवासी संघटनांनी केवळ ग्रामसेवकांचीच नव्हे तर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, विभाागीय आयुक्त महेश झगडे यांच्या चौकशीची मागणी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. संघटनेचे हे आंदोलन मीणा यांना अडचणीत आणण्यासाठी केले जात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक बाबी उघड झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आदिवासी महादेव कोळी संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला होता. मीणा यांच्यावर आदिवासी असल्यानेच दबाव आणला जात असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली होती, तर आमदारांच्या अन्य एका गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मीणा यांच्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मीणासमर्थक आणि मीणाविरोधक असे आमदारांचे दोन गट एकमेकांसमोर ठाकले होते. समर्थकांना डावलून मीणा यांनी आमदार बाळासाहेब सानप यांचा हात धरल्याने स्थानिक जि. प. सदस्य तसेच काही आमदारांनी उघड नाराजी दर्शविली होती. त्यामुळे समर्थक नेते मीणा यांची साथ सोडून देतील अशी अटकळ बांधली जात असताना समर्थकांनी मीणा यांची बाजू घेत थेट विभागीय आायुक्तांचीच चौकशी करण्याची मागणी संघटनेने केल्यामुळे संघटनेने एका दगडात अनेक पक्षी मारण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काहींची नाराजी दूर केलेली असतानाही त्यांच्याच चौकशीसाठी संघटना आता आक्रमक भूमिका घेऊ पाहत आहे. त्यामुळे आगामी काळात एकेकाळचे मीणा समर्थक यांच्या विरोधात आंदोलनाची धार वाढली जाण्याची शक्यता आहे.
ग्रामसेवकांवर संघटेनेचे लक्ष
ग्रामसेवक संघटनेचे कैलास वाघचौरे, सुरेश भोजने, संजय गिरी, प्रमोद ठाकरे यांना पाठीशी घालणारे यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्याचे उपायुक्त सुखदेव बनकर, विभागीय आयुक्त महेश झगडे यांची चौकशी करण्याची मागणी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने केली आहे. दीपककुमार मीणा यांची बदली करण्यात येऊ नये अशीदेखील मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ग्रामसेवक संघटनेवर आरोप
ग्रामसेवक संघटनेवर आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने आक्षेप घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी ग्रामसेवक संघटनेने आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. ग्रामसेवक संघटना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात बोलणी झाल्यानंतरही आदिवासी विकास संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.