एक गाव एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:58 PM2020-08-19T22:58:09+5:302020-08-20T00:22:15+5:30
नाशिक : आगामी सण, उत्सव लक्षात घेता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा जेणे करून उत्सव साजरा करताना एकोपा व खबरदारी घेतली जाईल असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक पंचायत समिती येथे कोरोनाबाबत आढावा बैठक घेवून तालुकास्तरीय यंत्रणेला विविध प्रकारच्या सुचना दिल्या.
उपक्रमास प्रोत्साहनलोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्यास कोरोनाचा प्रसार कमी होणार मदत होणार असून ग्रामपंचायतींनी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नाशिकपंचायत समिती येथे बैठकीमध्ये नियमित सर्वेक्षण तसेच साथ पसरू नये म्हणून गाव पातळीवर प्रतिबंधक उपाययोजना राबवितांना येणा-या अडचणी याबाबत माहिती घेण्यात आली तसेच त्यावर काय उपाययोजना करता येतील याविषयी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रवींद्र चौधरी, गटविकास अधिकारी सारिका बारी, डॉ. कैलास भोये यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस तालुकास्तरीय विभागप्रमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी आदि उपस्थित होते. फिजिकल डिस्टन्सिंगबाबत सूचनाग्रामपंचायतीने प्रत्येक गावांमध्ये स्वच्छता ठेवावी, नागरिकांना मास्क लावण्यास प्रवृत्त करावे, नियमित हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग याबाबत जागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या.तसेच ग्रामपंचायतीमध्ये याबाबत मार्गदर्शन करणारे स्टिकर-पोस्टर लावण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले.