जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नामांकन ‘आॅनलाइन’

By admin | Published: January 4, 2017 12:23 AM2017-01-04T00:23:13+5:302017-01-04T00:23:38+5:30

निवडणूक आयोग : मतदारांना वाटणार स्लीपा

Zilla Parishad, Panchayat Samiti's nomination 'Online' | जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नामांकन ‘आॅनलाइन’

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नामांकन ‘आॅनलाइन’

Next

नाशिक : लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व  पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये आॅनलाइन नामांकन सादर करावे लागणार असून, त्यानंतरच ते निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य आयोगाने काढलेल्या आदेशात मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटपही करण्याचे ठरविण्यात आले आहे.  राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना नामनिर्देशन पत्र व शपथपत्र सहजरीतीने भरता यावे यासाठी महाआॅनलाइनच्या मदतीने सॉफ्टवेअर तयार केले असून, उमेदवारांनी याच सॉफ्टवेअरमध्ये नामांकन भरणे अनिवार्य आहे.  सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरल्याची प्रिंट आउट काढल्यानंतर ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्यास नामांकन ग्राह्य धरण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवारांना मालमत्ता, दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे शपथपत्र, पक्षातर्फे निवडणूक लढवीत असल्याबाबतचे पत्र त्याच बरोबर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र व ते नसल्यास अर्ज सादर केल्याची पावती या साऱ्या गोष्टी जोडाव्या लागणार आहेत.
केवळ कार्यक्षेत्रापुरतीच आचारसंहिता
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू राहील; परंतु या आचारसंहितेने विकासकामांवर परिणाम होऊ नये म्हणून आयोगाने जिल्हा परिषद क्षेत्राबाहेरील म्हणजेच नगर पंचायत, नगर परिषद व महापालिका क्षेत्रात नेहमीप्रमाणे सर्व कामे व अनुषंगिक बाबी करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाही.
च्जिल्हा परिषदेतील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती वा घोषणा मंत्री, आमदार, खासदार यांना करता येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
मतदान चिठ्ठी वाटणार
च्लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच निवडणूक आयोगाने मतदारांना राजकीय पक्ष वाटतात त्याप्रमाणे मतदान चिठ्ठी वाटण्याचा निर्णय घेतला आहे.  च्बीएलओमार्फत घरोघरी जाऊन मतदारांना या चिठ्यांचे वाटप होईल. या चिठ्ठीत मतदाराचे नाव, मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती नमूद केलेली असेल.

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti's nomination 'Online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.