जिल्हा परिषद अध्यक्षांंचा ‘बसप्रवास’

By Admin | Published: September 2, 2016 10:48 PM2016-09-02T22:48:00+5:302016-09-02T22:48:42+5:30

गणेशगाव-गरुडेश्वर बससेवा सुरू : विद्यार्थ्यांची गैरसोय थांबली

Zilla Parishad president's bus expedition | जिल्हा परिषद अध्यक्षांंचा ‘बसप्रवास’

जिल्हा परिषद अध्यक्षांंचा ‘बसप्रवास’

googlenewsNext

नाशिक : जुन्या पुलाचे कारण देत गणेशगाव (त्र्यं.) ते गरुडेश्वर रस्त्यावरील बसवाहतुकीसह अन्य अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेली वाहतूक जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह स्थानिक मनसे नेत्यांच्या आंदोलनामुळे सुरू झाली आहे.
या रस्त्यावर मिनीबस वाहतुकीसह अन्य लहान वाहतुकींसाठी सर्वेक्षणाअंती सुरू करण्यात आली. या मिनी बसवाहतुकीतून स्वत: अध्यक्ष विजयश्री चुंबळे, एसटी विभागीय नियंत्रक यामिनी जोशी, रमेश खांडबहाले, दीपक वाघ आदिंनी बसप्रवास करून
या बसवाहतुकीचा शुभारंभ केला.राज्यात अतिवृष्टीमुळे महाड येथील पूल वाहून गेल्यामुळे जिल्ह्णातील जुने व दुरवस्था झालेले पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात यावेत, या जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक तालुक्यताील काही पुलांवरून वाहतूक बंद केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने नाशिक तालुक्यातील मौजे गणेशगाव (त्र्यं.) शिवणगाव, पिंपळगाव - गरुडेश्वर या गावांना जोडणाऱ्या पुलावरून एसटीची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश खांडबहाले यांनी संबंधित गावच्या विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने या विद्यार्थ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंंदोलन केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad president's bus expedition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.