जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:38 PM2019-12-26T23:38:08+5:302019-12-26T23:38:44+5:30
झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते.
दाभाडी : झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते.
वैयक्तिक स्पर्धेत लहान गटात धावणे मुली प्रथम भाग्यश्री जाधव - हरणशिकार, धावणे मुले प्रथम जयेश जाधव - साजवहाळ, रांगोळी प्रथम संजना अहिरे जि. प. शाळा दहिदी, वैयक्तिक गीतगायन प्रथम साक्षी गांगुर्डे - जि. प. शाळा टिंघरी, वैयक्तिक नृत्य प्रथम कावेरी बागुल - जि. प. शाळा गुगुळवाड, चित्रकला प्रथम प्रफुल्ल वेताळ जि. प. शाळा साजवहाळ.
वक्तृत्व प्रथम ज्ञानदा जयवंत भामरे जि. प. शाळा टिंघरी तर मोठ्या गटात धावणे मुली प्रथम चांदणी सोपारकर घाणेगाव, धावणे मुले प्रथम सोहेल युसुफ पठाण - गाळणे उर्दू, रांगोळी प्रथम साक्षी अमृतकार जि. प. शाळा भिलकोट, वैयक्तिक गीतगायन प्रथम देवयानी देवरे - जि. प. शाळा साजवहाळ, वैयक्तिक नृत्य प्रथम आकाश गायकवाड - जि. प. शाळा साजवहाळ, चित्रकला प्रथम जैनब अशरफ - झोडगे उर्दू, वक्तृत्व प्रथम जयश्री दात्रे - जि. प. शाळा साजवहाळ, सांघिक स्पर्धेत लहान गटात सामुहिक गायन प्रथम जि. प. शाळा टिंघरी, सामुहिक नृत्य प्रथम जि. प. शाळा कौळाणे (गा.), मोठ्या गटात सामुहिक गायन प्रथम जि. प. शाळा जळकू, सामुहिक नृत्य जि. प. शाळा साजवहाळ, कबड्डी मुले जि. प. शाळा घाणेगाव, कबड्डी मुली जि. प. शाळा साजवहाळ, खो-खो मुले जि. प. शाळा कंक्राळे, खो-खो मुली जि. प. शाळा घाणेगाव शाळेचे विद्यार्थी व संघ विजयी झाले.
स्पर्धा पहिली ते चौथी लहान गट व पाचवी ते आठवी मोठा गट या दोन गटात घेण्यात आल्या. यामध्ये कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये डोंगराळे, करंजगव्हाण, झोडगे या तीन केंद्रांवर प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांनी व संघांनी सहभाग घेतला. सदर सर्व विजयी स्पर्धकांची तालुका पातळीवर निवड झाली. मैदानी खेळाचे पंच म्हणून एन. एस. देसले यांनी काम पाहिले. बक्षीस करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी, यतिन शेलार, नीलेश नहिरे यांनी केले. आभार सुयोग बाविस्कर यांनी मानले.