जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचे पारितोषिक वितरण
By admin | Published: January 16, 2016 10:47 PM2016-01-16T22:47:47+5:302016-01-16T22:58:55+5:30
जायखेडा : खेळाडूंची चमकदार कामगिरी
जायखेडा : खेळाडूंची चमकदार कामगिरीजिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचे पारितोषिक वितरणजायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
केंद्रप्रमुख प्रमिला भामरे अध्यक्षस्थानी होत्या. १५ शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. मुख्याध्यापक एकनाथ जाधव यांनी प्रास्ताविक केले. बेबीनंदा धामणे, रावसाहेब भामरे, संजय अहिरे, दिलीप चव्हाण, प्रशांत बैरागी, हेमलता धोंडगे, सुधाकर पगार, जयश्री चव्हाण, सुरेखा कापडणीस, रमेश खैरनार, जिभाऊ मोरे, प्रकाश भदाणे आदिंनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- वैयक्तिक गायन (लहान गट)- दीपाली जितेंद्र अहिरे (प्रथम, शेवडीपाडा शाळा), पूनम विकास माळी (द्वितीय, वाडीपिसोळ शाळा), शुभम काकाजी मोरे (तृतीय, जायखेडा शाळा), समूह गायन- जायखेडा शाळा, मुले (प्रथम), जायखेडा शाळा, मुली (द्वितीय), वाडीपिसोळ शाळा (तृतीय), वैयक्तिक नृत्य- मेघराज उपेंद्र जगताप (प्रथम, जायखेडा शाळा) आश्विनी सुशील मोरे (द्वितीय, जायखेडा शाळा) नवतेज चंद्रकांत खैरनार (तृतीय, जायखेडा शाळा), समूह नृत्य- जायखेडा शाळा मुली (प्रथम), जायखेडा शाळा मुले (द्वितीय), वाडीपिसोळ शाळा (तृतीय), चित्रकला- प्रदीप गणेश जगताप (प्रथम, जायखेडा शाळा), जयराम रमेश गायकवाड ( द्वितीय, वाडीपिसोळ शाळा), भगवान विलास सोनवणे (तृतीय, पाडगण डोंगरीशाळा), १०० मीटर धावणे (मुली)- दीपाली जितेंद्र अहिरे (प्रथम, शेवडीपाडा शाळा), रत्ना गुलाब गायकवाड
(द्वितीय, खडकीपाडा शाळा), दीपाली सुकदेव जगताप (तृतीय, जायखेडा शाळा), २०० मीटर धावणे (मुले)- चैतन्य दत्तात्रेय अहिरे (प्रथम, जायखेडा शाळा), सागर श्रावण गांगुर्डे (द्वितीय, पाडगण डोंगरीशाळा), भरत माणिक ठाकरे (तृतीय, वाडीपिसोळ शाळा), ४०० मीटर धावणे (मुले, मोठा गट)- रोशन दिलीप मोरे ( प्रथम, जायखेडा शाळा), विलास कैलास पवार (द्वितीय, जायखेडा शाळा), मोहमद्द कैफ साबीर शेख (तृतीय, उर्दू शाळा, जायखेडा), ४०० मीटर धावणे (मुली,मोठा गट)- माया कैलास ठाकरे (प्रथम, जायखेडा शाळा), रत्ना कैलास पवार (द्वितीय,
जायखेडा शाळा), मिसबाह अमीन पठाण (तृतीय, उर्दू शाळा, जायखेडा), वक्तृत्व स्पर्धा- दीपेश कोमलराज खैरनार (प्रथम,
जायखेडा शाळा), माहेश्वरी
दीपक सासले (द्वितीय, जायखेडा शाळा).