जिल्हा परिषद शाळा, नांदूरवैद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:16+5:302021-08-19T04:18:16+5:30
भारतीय सैन्यदलातील जवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना संपला आहे, असा गैरसमज न करता आपण सर्वांनी ...
भारतीय सैन्यदलातील जवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना संपला आहे, असा गैरसमज न करता आपण सर्वांनी काळजी घ्यावी हाच खरा स्वातंत्र्यदिन आहे, असे यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार बोराडे यांनी सांगितले. यावेळी छोट्या छोट्या मुलांनी इंग्रजी भाषेतून आपले मनोगत व्यक्त करत स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे, सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे, तलाठी श्रीमती सुवर्णा गांगुर्डे, उपसरपंच सविता काजळे, मुख्याध्यापक नंदकुमार बोराडे, सहशिक्षिका वैशाली आहिरे, जितेंद्र नगराने, आरोग्यसेवक हितेश घरटे, अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, सुनीता मुसळे, मोनिका सोनवणे, सुमन भोर, आरोग्यसेविका मंगला कणसे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, मदतणीस सुजाता रोकडे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे, मनसेचे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मुसळे, मनोहर काजळे, रवि काजळे, राजू रोकडे, कमलाकर दवते, मारुती डोळस, माधव कर्पे, रामकृष्ण दवते, संतोष भागवत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- १८ नांदूरवैद्य स्कूल
किसन काजळे
नांदूरवैद्य येथील जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहणप्रसंगी मुख्याध्यापक नंदकुमार बोराडे समवेत ॲड. चंद्रसेन रोकडे, जितेंद्र नगराळे, सैनिक किरण काजळे व इतर.
180821\18nsk_18_18082021_13.jpg
फोटो- १८ नांदूरवैद्य स्कूल