जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरा होणार प्रवेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:31 AM2018-06-06T00:31:55+5:302018-06-06T00:31:55+5:30
नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, या काळात सर्व शाळांमध्ये प्रवोशोत्सवही साजरा करण्यात येणार आहे.
नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून, या काळात सर्व शाळांमध्ये प्रवोशोत्सवही साजरा करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पटनोंदणी व शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार असून, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे नियोजन पाठवले आहे. त्यानुसार, ११ जूनला गटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, गटशिक्षणाधिकारी अथवा प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, कें द्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पटनोंदणी पंधरवडा व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आयोजनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकाºयांच्या नियुक्त्याही याच दिवशी करण्यात येणार आहेत. १२ जूनला जिल्हास्तरावर संपर्क अधिकाºयांची पटनोंदणी पंधरवड्यात शाळांना भेटी देण्याचे नियोजन भेट पत्राचे वाटप करण्यासोबतच स्थानिक माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
१५ जूनला शाळा प्रवेश दिंडी, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरित करणे, मोफत गणवेश खरेदीचा आढावा घेण्यात येणार असून, १५ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशासाठी पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमाचे शिबिर, २५ जूनला गावात शाळाबाह्ण मुलांच्या भेटी घेणे, २५ ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष पालकांच्या भेटी घेऊन मुलांना शाळेत प्रवेशित करून १ जुलैला पटनोंदणी पंधरवड्यात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व गटविकास अधिकाºयांना केल्या आहेत. मुलांना शाळेत आणण्यासाठी देणार दवंडी
१३ जून रोजी प्रत्येक शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची सभा होणार असून, १३ ते १६ जून या कालावधीत गावपातळीवर दवंडी देऊन मुलांना शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. १४ जूनला सायंकाळी गावस्तरावर ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, सर्व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी मशाल फेरीचे आयोजन करणे, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.