जिल्हा परिषदेची आज स्थायी समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:51 PM2020-07-30T22:51:49+5:302020-07-31T01:34:00+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिकसभा शुक्रवारी आॅनलाइन होणार आहे. पदाधिकारी व समिती सदस्यांना आहे तेथूनच आॅनलाइन या सभेत सहभाग घेता येईल. मासिक सभा असल्याकारणाने नियमित विषयावर या सभेत चर्चा अपेक्षित असली तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यावर उपाययोजना, आगामी काळात कुपोषण निर्मूलनासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना, कर्मचाऱ्यांच्या बदल्या व औषध खरेदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेची स्थायी, सर्वसाधारण तसेच विषय समित्यांची मासिक सभा आॅनलाइन होत असून, शासनाने कोरोनाच्या काळात संक्रमण रोखण्यासाठी शासकीय बैठका एकत्रित घेण्यात मज्जाव केला आहे. जिल्हा परिषदेची शुक्रवारी होणारी स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी प्रशासनाला पत्र पाठवून केली होती. प्रशासनानेदेखील या सभेसाठी तशी तयारी दर्शवून त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन मागविले होते. मात्र प्रशासनाने अधिकारी व पदाधिकाऱ्यांची संयुक्त सभा घेण्यास शासन आदेशान्वये निर्बंध घातले आहेत. ़प्रशासनाने आॅनलाइनच सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्णातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आरोग्य विभाग त्यावर उपाययोजना करीत आहेत, मात्र असे असूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या विषयावर सदस्यांकडून विचारणा होण्याची शक्यता आहे. कृषी सभापती संजय बनकर यांनी प्रशासनाला पत्र देऊन आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेल्या औषध खरेदीची माहिती मागविली असून, त्यावरून विषय गाजणार असे दिसते.