जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:02 AM2018-03-01T02:02:54+5:302018-03-01T02:02:54+5:30
जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाºया वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाºयांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाºया वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाºयांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाºयांना बसला आहे. जिल्हा परिषद आवारात पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने आणि दिवसभरात अनेक वाहने येथे उभी केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या मार्गात वाहन कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय नेते, माजी सदस्य तसेच ठेकेदारांची वाहने जिल्हा परिषद आवारात आणली जातात. त्यामुळे सदर वाहने आत आणणे आणि बाहेर घेऊन जाणे यामुळे वाहनकोंडीचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाला सर्वांनाच मदत करावी लागत असल्याने आलेल्या वाहनांना आत घेण्यापासून बाहेर जाण्यासाठी मदतही करावी लागते. त्यातच अनेक कर्मचारी हे आपली दुचाकी मुख्य इमारतीच्या मागील बाजूस उभी करतात. त्यामुळे त्यांना या चारचाकी वाहनांतूनही दुचाकी काढणे कठीण होते. यातून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. या प्रकारामुळे ‘जिल्हा परिषद आवार की वाहनतळ’ असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात यापुढे शासकीय वाहने, पदाधिकाºयांची वाहने तसेच अधिकाºयांच्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार असून माजी सदस्य, ठेकेदार तसेच कर्मचाºयांच्या चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच दुचाकी वाहने मुख्य प्रवेशद्वारातून आणण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या आदेशामुळे गेल्या दोन दिवसांपासून खासगी वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यामुळे काही प्रमाणात आवार मोकळे जाणवू लागले आहे.
मोठ्या वाहनांमुळे कोंडीत भर
जिल्हा परिषद आवारात वाहन आणण्यासाठी अनेक लोक सुरक्षारक्षकाशी वाद घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच अधिकाºयांची नावे सांगून वाहने आतमध्ये आणण्यासाठी हुज्जत घातली जाते. अनेक वाहनधारक तर राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे तर वाद अधिक निर्माण होतो. विशेष म्हणजे ‘तथाकथित’ नेत्यांची वाहने ही भली मोठी असल्यामुळे तर अशी वाहने जिल्हा परिषद आवारात आल्यानंतर कोंडी अधिक वाढते.