जिल्हा परिषद शाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:41 PM2019-03-28T17:41:44+5:302019-03-28T17:41:59+5:30
सिन्नर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला असून आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद शाळा भरणार आहे.
सिन्नर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला असून आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद शाळा भरणार आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करून सकाळी ७ ते दुपारी १.३० या वेळ अंतिम परिक्षा होईपर्यंत निश्चीत केली होती. मात्र या वेळेनुसार शाळा सुटण्याची वेळ दुपारची वेळ विद्यार्थ्यांसाठी गैरसोईची असल्याच्या तक्रारी येत होत्या. सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील मुलांना शाळा सुटल्यावर अनवाणी पायांनी चटके सोसत घराकडे जावे लागत असल्याचे व एका मुलास उष्माघाताने नाकाततू रक्तश्राव होत झाला होता. त्यामुळे शाळेची वेळ पूर्ववत ११ ते ५ अशी करावी या पालकांच्या मागणी केली होती. बुधवार (दि.२७) पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुधारीत आदेश प्रसिद्ध केला असून गुरूवार (दि.२८) पासून सकाळी १०.४० ते सायंकाळी ५ या वेळेत शाळा भरण्याचे फर्मान सोडले आहे.
वाढते ऊन आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारे असते. सकाळी १० वाजेपासून उन्हाचे चटके सोसावे लागत असल्याने व दुपारनंतर वातावरणात प्रचंड उकाडा असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय चुकीचा ठरला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या ग्रामीण भागात सर्वाधिक असून दुपारी १ वाजेनंतर शाळा सुटल्यावर कडक उन्हात मुलांना घराकडे जावे लागत होते. ग्रामीण भागात बहुतांश मुले वाड्या-वस्त्यांवरून शाळेत येत असतात. तीन व त्याहून अधिक किलोमीटर दुपारच्या उन्हात पार करणे या मुलांच्या जीवावर बेतणारे ठरले होते.