‘झिम पोरी झिम’ संघ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:11 AM2017-09-01T01:11:14+5:302017-09-01T01:11:43+5:30
महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे विरार, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
नाशिक : महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे विरार, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
विद्या पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या मंगळागौर स्पर्धेत नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल अशा राज्यातील ४५ संघांनी सहभाग नोंदवला होता. नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ या संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सहभाग प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या संघात प्राची कुलकर्णी, देवयानी लेले, संगीता मुळे, स्नेहल जोशी, श्रद्धा कुलकर्णी, पूर्वा सावजी, मृण्मयी मुळे, अनुजा मेहेंदळे, अनुश्री साखरे, अनघा मोघे, संगीता गोगटे, पूर्वा जोशी, स्नेहल पोखरणकर, अनघा जोशी आणि सुचेता सोनार, हर्षल खैरनार (तबला) आदी सदस्यांचा सहभाग होता. यावेळी यंगस्टार्स ट्रस्ट मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शहा, समन्वयक अजीव पाटील, स्नेहा पाटील उपस्थित होते.