जिप अध्यक्ष चषक स्पर्धा खामखेडा येथे उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 07:08 PM2019-12-24T19:08:02+5:302019-12-24T19:10:49+5:30

खामखेडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बीट स्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या ...

Zip President's Cup cheer at Khamkheda | जिप अध्यक्ष चषक स्पर्धा खामखेडा येथे उत्साहात

खामखेडा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धाचे उद्द्घाटन करतांना उषा बोरसे समवेत आण्णा पाटील, संजय मोरे, अनुप शेवाळे, सुनील शेवाळे, बापू शेवाळे, प्रशांत शेवाळे, शिरीष पवार, आबा शेवाळे, संगीता सूर्यवंशी,चित्रा सोनवणे व शिक्षक वृद.

Next
ठळक मुद्देर्स्पधाचे उद्घाटन सोसायटीच्या संचालक उषा बोरसे यांच्या हस्ते

खामखेडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बीट स्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या र्स्पधाचे उद्घाटन सोसायटीच्या संचालक उषा बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अण्णा पाटील तर प्रमुखपाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनुप शेवाळे, उपसरपंच संजय मोरे, सोसायटीचे चेअरमन अरुण शेवाळे, सुनील शेवाळे, प्रशांत शेवाळे, बापू शेवाळे होते. या स्पर्धेत केंद्रातील १६ प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदविला.

केंद्रस्तरीय स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे :
लहान गट वक्तृत्व स्पर्धा : १) हर्षाली राहुल आहेर (हनुमाननगर), २) प्रतीक्षा दीपक बोरसे (मोरेवाडी), ३) भाग्यश्री संजय पवार. चित्रकला स्पर्धा - १) शुभम देवरे (हनुमाननगर), ३) शेख इर्शास (सावकी), आदित्य बोरसे (सावकी). वैयक्तिक गायन : १) कार्तिका मच्छिंद्र आहेर, २) प्रज्वल आपाजी शेवाळे (थळवस्ती), ३) पूजा अंबादास मोरे (भऊर). वैयक्तिक नृत्य : १) विजल कैलास पवार (भऊर), २) श्रध्दा योगेश शिरसाठ, ३) जान्हवी निलेश पाटील (हनुमाननगर). धावणे मुले : १) चेतन हुसेन्सिंग आहेर (खामखेडा), २) गणेश जनार्दन शिवले (सावकी), ३) हर्षल भिवराज वाघ (वसाका). धावणे मुली : १) रोशनी कृष्णा पवार (निकमवाडी), २) कार्तिकी मच्छिंद्र आहेर (हनुमाननगर), ३) अर्चना मनोज सोनवणे (खामखेडा). समूहनृत्य : १) जि. प. प्राथमिक शाळा सावकी, २) जि. प. शाळा हनुमाननगर, ३) जि.प.शाळा थळवस्ती.
मोठयÞा गटात वक्तृत्व स्पर्धा : वैष्णवी भगवान राणे (वसाका). चित्रकला स्पर्धा : १) दीपक माळी (सावकी), २) नेश भिवराज वाघ (वसाका), वैयक्तिक गायन : १) सुशांत आहिरे (सावकी), २) पूजा पवार (वसाका). वैयक्तिक नृत्य : १) साक्षी सोनवणे (सावकी). धावणे मुली : १) वैष्णवी राठोड (वसाका), २) आकांक्षा गांगुर्डे (सावकी), धावणे मुले : १) नितीन गवळी (सावकी), २) गोपाळ चव्हाण (वसाका). समूहनृत्य व समुहगायन १) जि. प. प्राथमिक शाळा वसाका सावकी हे यशस्वी झाले.

सूत्रसंचालन आबा शेवाळे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी संजू आहेर, संजय गुंजाळ, निलेश कदम, संगीता सूर्यवंशी, चित्रा सोनवणे, भरत सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, दिग्विजय गांगुर्डे, आनंदा पवार, प्रवीण शेवाळ, रोहिणी बागुल, योगिता कापडणीस, प्रमिला पवार, सुरेश पाटील, अनंत देवरे, दीपक जाधव, नितीन सोनवणे, दिलीप वाघ आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
दरम्यान बीट स्तरावर ह्या शाळांची निवड करण्यात आली असून यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून गौरविण्यात आले.

Web Title: Zip President's Cup cheer at Khamkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.