साकोरा येथे जि.प. शाळेत पालक मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:38 PM2019-07-09T19:38:11+5:302019-07-09T19:38:51+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाचा पालक मेळावा उत्साहात पार पडला.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. शिक्षक गणेश साळी यांनी विद्यार्थी लाभाच्या योजना, शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थी उपस्थिती, नियमित गृहपाठ करणे, इंग्रजी वाचन, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, दरमहा मराठी व गणित विषयाची सराव चाचणी, एक मूल एक झाड तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढी संदर्भात पालकांना परिपुर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांनी आपल्या पाल्याकडे नियमित लक्ष देवून दररोज शाळेत पाठवावे. पाल्य घरी आल्यावर अभ्यास करतो किंवा नाही हे पहावे. तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पुर्ण करण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पालकांनी आपल्या मुलांना मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्दगर्शन केले जाणशर असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, संदीप बोरसे, संजय बोरसे, संदीप पैठणकर, सतिष भामरे, प्रविण भामरे, सतिष सोनवणे, संतोष डघळे, ठाणसिंग पाटील, विजय सुरसे, संतोष सुरसे, विनोद बोरसे, प्रवीण बोरसे,वसंत निकम, मुकेश बोरसे आदी पालक उपस्थित होते.