जि.प., पं.स. असोसिएशनची जिल्हा कार्यकारी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:33+5:302021-07-17T04:12:33+5:30

जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनची विभागीय बैठक प्रदेशाध्यक्ष कैलास गारे-पाटील, कार्याध्यक्ष उदय बने, महिला प्रदेशाध्यक्ष अमृता पवार, कोकण अध्यक्ष ...

Z.P., P.S. District Executive of the Association declared | जि.प., पं.स. असोसिएशनची जिल्हा कार्यकारी घोषित

जि.प., पं.स. असोसिएशनची जिल्हा कार्यकारी घोषित

Next

जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनची विभागीय बैठक प्रदेशाध्यक्ष कैलास गारे-पाटील, कार्याध्यक्ष उदय बने, महिला प्रदेशाध्यक्ष अमृता पवार, कोकण अध्यक्ष सुभाष घरत, राज्य संघटक दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१५) झाली. बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांवर प्रामुख्याने चर्चा झाली. जि.प. व प. स. सदस्यांच्या अधिकारसह विविध विषयांबाबत केंद्रीय पंचायत राजमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय बैठकीत झाला. या बैठकीत अमृता पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. यात डॉ. आत्माराम कुंभार्डे (जिल्हाध्यक्ष) जि. प. सभापती संजय बनकर (कार्याध्यक्ष), यशवंत शिरसाठ (प्रसिद्धी प्रमुख), सिद्धार्थ वनारसे, समाधान हिरे, कावजी ठाकरे, उदय जाधव, सुरेश कमानकर (उपाध्यक्ष), महेंद्र काले (संघटक), दीपक शिरसाठ (सरचिटणीस), नयना गावित (महिला जिल्हाध्यक्ष), जि. प. सभापती आश्विनी आहेर (महिला जिल्हा कार्याध्यक्ष), सीमंतिनी कोकाटे, सुनीता चारोस्कर, सविता पवार, पुष्पा धाकराव, कविता धाकराव (महिला जिल्हा उपाध्यक्ष). तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे प्रवीण गायकवाड (येवला), शिवा सुरासे (निफाड), रमेस बोरसे (नांदगाव), अरुण पाटील (मालेगाव), नितीन आहेर (चांदवड), साधना गवळी (सटाणा), गीताजंली पवार-गोळे (कळवण), एन. डी. गावित (सुरगाणा), भास्कर गावित (पेठ), भास्कर भगरे (दिंडोरी), मोतीराम दिवे (त्र्यंबकेश्वर), रत्नाकर चुंभळे (नाशिक), हरिदास लोहकरे (इगतपुरी), वैशाली खुळे (सिन्नर), नूतन आहेर (देवळा) याचा समावेश आहे. बैठकीस प्रदेश पदाधिकारी नीलिमा पाटील, गोरख बोडके, रूपांजली माळेकर, विनायक माळेकर यांसह नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजित साबळे यांनी केले.

Web Title: Z.P., P.S. District Executive of the Association declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.