मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:10 PM2018-04-25T22:10:33+5:302018-04-25T22:10:33+5:30

आचारसंहितेमुळे कार्यालयीन कामकाजावर काहीसा परिणाम जाणवत असला तरी, या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शिबिर घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.

zp,ceo,review,gite,seminar,officers | मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा

Next
ठळक मुद्देआश्वासित प्रगती योजना व पदोन्नती प्रारूप पडताळणीजिल्हा परिषद : प्रस्ताव आणि पदोन्नती पडताळणीचे शिबिर

नाशिक : आचारसंहितेमुळे कार्यालयीन कामकाजावर काहीसा परिणाम जाणवत असला तरी, या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शिबिर घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी, आश्वासित प्रगती योजना आणि पदोन्नती कामांबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करून अनेक विभागांमधील प्रस्ताव आणि योजनांचा आढावा घेतला. शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणी लाभाबाबत प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करणे तसेच आश्वासित प्रगती योजना व पदोन्नती प्रारूप पडताळणी शिबिराचे आयोजन करून त्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणी लाभाबाबत जिल्हा परिषदेच्या नवीन रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी आयोजित शिबिरामध्ये एकूण ७०० प्रस्ताव प्राप्त झाले असल्याची माहिती समोर आली. शिक्षण विभागामार्फत सदर प्रस्ताव छाननी करून तपासले गेले आहेत. या प्रस्तावांची प्रकरणनिहाय तपासणी प्रपत्र तयार करण्यात आले आहे. या तपासणी यादीनुसार पुनश्च हे प्रस्ताव जिल्ह्यातील गटविकास अधिकारी आणि सहायक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहेत. गटविकास अधिकारी यांच्या तपासणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नियुक्त पाच खातेप्रमुखांच्या तपासणी समितीमार्फत हे प्रस्ताव तपासण्यात येत आहेत. या शिबिरामध्ये गिते यांनी आस्थापनाविषयक बाबी, मूळ गोपनीय अहवालात घ्यावयाच्या नोंदी, मक्ता व दायित्व तपासणी करणेबाबत सर्व उपस्थित गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांना मार्गदर्शन केले.

Web Title: zp,ceo,review,gite,seminar,officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.