०९... कोंदामेंढी... रस्ता
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:23+5:302015-02-10T00:56:23+5:30
मार्गाच्या दुरुस्तीला विलंब
Next
म र्गाच्या दुरुस्तीला विलंबनिधी मंजूर : महालगाव परिसरातील रस्त्यांची दैनावस्थाकोदामेंढी : नजीकच्या तोंडली-खिडकी मार्गाच्या डांबरीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, सदर काम एक वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मौदा तालुक्यातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांपैकी तोंडली ते खिडकी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. सदर काम वर्षभरापासून रखडले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला. तोंडली-धानोली या मार्गाच्या दुरुस्तीसाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यालाही वर्ष लोटले असून, कंत्राटदार सुदीप याने काम सुरू केले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तांडा ते महालगाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या मार्गाच्या कडेला एक ट्रक गिट्टीचे चार ढिगारे टाकण्यात आले असून, त्यात थातूरमातूर काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पिंपळगाव, तांडा व महालगाव येथील ग्रामपंचायतची मासिक सभा नुकतीच पार पडली. त्या सभेत सदर कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे त्या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती. वायगाव-सिरसोली मार्गाच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले असले तरी, त्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या संपूर्ण कामाला सुरुवात करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. करण्यात आलेल्या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून आधी चौकशी करण्यात यावी, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना कामाचे देयके अदा करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. (वार्ताहर)***