1) सीडीसाठी -गोव्यात रात्री उशिराच्या पाटर्य़ा बंद मुख्यमंत्र्यांचा इशारा : ड्रग्स व्यवहार रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश

By Admin | Published: March 23, 2017 05:15 PM2017-03-23T17:15:42+5:302017-03-23T17:15:42+5:30

पणजी : राज्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पाटर्य़ांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी दिले आहेत. ड्रग्स व्यवहार बंद करण्यासाठी कठोर करावाईचे आदेशही दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि तीत या संदर्भातील सूचना दिल्या.

1) For CD - Closed cessation of late night street lights: Order for strict action against drug trafficking | 1) सीडीसाठी -गोव्यात रात्री उशिराच्या पाटर्य़ा बंद मुख्यमंत्र्यांचा इशारा : ड्रग्स व्यवहार रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश

1) सीडीसाठी -गोव्यात रात्री उशिराच्या पाटर्य़ा बंद मुख्यमंत्र्यांचा इशारा : ड्रग्स व्यवहार रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश

googlenewsNext
जी : राज्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या पाटर्य़ांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी दिले आहेत. ड्रग्स व्यवहार बंद करण्यासाठी कठोर करावाईचे आदेशही दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि तीत या संदर्भातील सूचना दिल्या.
बुधवारी सभापती निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महामार्गांलगतची सर्व अतिक्रमणे हटविली जातील, रस्त्यालगतचे हेल्मेट विक्रेते, शहाळी विक्रेत्यांनाही हटवले जाईल, अशी माहिती र्पीकर यांनी दिली.
राज्यात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश संगीत लावून पाटर्य़ा चालतात त्या बंद केल्या जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, महिलांवर अत्याचाराबाबत तक्रार आल्यास गय केली जाणार नाही. प्रत्येक तक्रारीची कसून चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधिकार्‍यांना दिले आहेत.


कोट

सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात दिलासा दिला आहे. जनतेच्या गरजा व इतर गोष्टी लक्षात घेऊनच तो तयार केला आहे. त्यात धोरणात्मक निर्णयांचे प्रतिबिंब दिसेल.
- मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री, गोवा

चौकट

सभापतीपदी डॉ. प्रमोद सावंत
विधानसभेतील 80 टक्के सदस्य माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ आहेत याचे मला भान आहे. मी सभागृहाचे कामकाज नि:पक्षपातीपणे हाताळीन, अशी ग्वाही सभापतीपदी निवडून आल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेस दिली. साखळीचे भाजप आमदार असलेले प्रमोद सावंत वीसविरुद्ध पंधरा मतांच्या फरकाने विजयी झाले.

उपसभापती लोबो
आज निवड
कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो यांना प्रथमच उपसभापतीपद प्राप्त होणार आहे. लोबो हे आज गुरुवारी सत्ताधारी आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज विधिमंडळ खात्यास सादर करतील. लोबो सलग दोनवेळा कळंगुट मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Web Title: 1) For CD - Closed cessation of late night street lights: Order for strict action against drug trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.