देशात कोरोनातून बरे झाले १ कोटी ९ लाख लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:37 AM2021-03-11T05:37:40+5:302021-03-11T05:37:59+5:30
१८ हजार नवे रुग्ण; १३३ जणांचा बळी; उपचाराधीन रुग्णसंख्याही वाढतेय
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात १ कोटी ९ लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले. बुधवारी या संसर्गाचे सुमारे १८ हजार रुग्ण आढळले असून, आणखी १३३ जण मरण पावले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे.
अमेरिकेत लस घेतलेल्यांना मास्क न घालण्याची मुभा
nअमेरिकेत लस घेतलेल्यांना चार भिंतींच्या आत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी एकत्र जमण्याची परवानगी देण्यात आली आहे.
nतिथे त्यांना मास्क न घालण्याची किंवा शारीरिक अंतर न पाळण्याची मुभा यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी)ने दिली आहे.
nमात्र, लस घेतलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे अद्यापही बंधनकारक आहे.
nअमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ९८ लाख असून, येत्या काही दिवसांत ती ३ कोटींवर जाण्याची शक्यता आहे.