भाजपाचा केजरीवालांवर १ कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा
By admin | Published: July 17, 2014 07:07 PM2014-07-17T19:07:19+5:302014-07-17T19:07:19+5:30
दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने पैशांचा घोडेबाजार केला असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्या चांगलाच अंगलट येणार असल्याचे दिसत आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने पैशांचा घोडेबाजार केला असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्या चांगलाच अंगलट येणार असल्याचे दिसत आहे. भाजपाने हा आरोप खोडून काढत केजरीवाल यांच्या विरोधात १ कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला असून त्यांना रितसर नोटीसही पाठविली आहे.
आम आदमी पक्षाचे संयोजक केजरीवाल यांनी एका ऑडियो टेप प्रसारीत करून भाजपाने दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना २० कोटी रूपयांची ऑफर देवू केली आहे असा थेट आरोप केला होता. परंतू हा आरोप धांदात खोटा आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले होते तसेच केजरीवाल यांच्याकडे पुरावा असल्यास ते देण्यास सांगितले होते. केजरीवाल यांच्या आरोपाची गंभीर दखल घेत भाजपाने त्यांना नोटीस पाठविली असून त्यांच्याविरोधात १ कोटी रूपसांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी याआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांचा भ्रष्टचारी नेत्यांमध्ये समावेश केला होता. त्यानंतर गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता याची दखल घेत दिल्ली न्यायालयाकडून केजरीवाल यांच्याविरूध्द आरोप दाखल करण्यात आले आहेत.