व्हिजिलन्स अधिकाऱ्याला 1 कोटींची लाच; 50 लाख देताना पंजाबच्या माजी मंत्र्याला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 04:47 PM2022-10-16T16:47:10+5:302022-10-16T16:47:20+5:30

पंजाबचे माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांना पंजाब व्हिजिलन्सच्या एआयजीला लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

1 crore bribe to vigilance officer; Former Punjab minister caught giving 50 lakhs | व्हिजिलन्स अधिकाऱ्याला 1 कोटींची लाच; 50 लाख देताना पंजाबच्या माजी मंत्र्याला पकडले

व्हिजिलन्स अधिकाऱ्याला 1 कोटींची लाच; 50 लाख देताना पंजाबच्या माजी मंत्र्याला पकडले

Next

मोहाली: पंजाबचे माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांना पंजाब व्हिजिलन्सच्या एआयजीला(IG) लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात, दक्षता अधिकाऱ्याला 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. 50 लाख रुपये देण्यासाठी अरोरा चंदीगडला पोहोचले, तिथे त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. अरोरा यापूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. 

काल एफआयआर नोंदवला
दक्षता ब्युरो (VB) पंजाबने माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्यावर ब्यूरोच्या सहाय्यक महानिरीक्षकाला (AIG) 50 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. दक्षता ब्युरोचे मुख्य संचालक वरिंदर कुमार यांनी सांगितले की, मनमोहन कुमार यांच्या सांगण्यावरुन 15 ऑक्टोबर रोजी माजी मंत्र्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता.

अधिकाऱ्याशी पैशांची बोलणी केली
मुख्य संचालक म्हणाले की, एआयजी मनमोहन कुमार यांच्या तक्रारीनुसार, अरोरा यांनी 14 ऑक्टोबर रोजी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या दक्षता तपासात बाजू घेण्यासाठी त्यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली. माजी मंत्र्याने दुसऱ्या दिवशी 50 लाख रुपये आणि उर्वरित रक्कम नंतरच्या तारखेला देण्याची ऑफर दिली. याप्रकरणी अरोरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

अडीच तास घराची झडती घेतली
अटकेनंतर दक्षता पथक रात्री 11 वाजता त्यांच्या होशियारपूरच्या घरी पोहोचले. तिथे सुमारे अडीच तास घराची झडती घेण्यात आली. लाच देण्याच्या आरोपाखाली सुंदर शाम अरोरा यांना मोहाली न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना 3 दिवसांच्या दक्षता कोठडीवर पाठवण्यात आले आहे. 

Web Title: 1 crore bribe to vigilance officer; Former Punjab minister caught giving 50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.