सिंधी कॉलनीत १लाख ६० हजारांची चोरी

By admin | Published: January 26, 2016 12:04 AM2016-01-26T00:04:53+5:302016-01-26T00:04:53+5:30

आठवड्याभरात तिसरी घटना : दरवाजा उघडा असल्याचा घेतला फायदा

1 lakh 60 thousand stolen in Sindhi colony | सिंधी कॉलनीत १लाख ६० हजारांची चोरी

सिंधी कॉलनीत १लाख ६० हजारांची चोरी

Next
वड्याभरात तिसरी घटना : दरवाजा उघडा असल्याचा घेतला फायदा
जळगाव : घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोराने घरातून एक लाख ६० हजार रुपयाच्या ऐवज चोरुन नेल्याची घटना २५ रोजी पहाटे घडली. आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे.
कंवर नगर,सिंधी कॉलनी परिसरातील रहिवाशी सुरेश गोपालदास नाथाणी (२९) व पत्नी पहाटे प्रात: विधीसाठी गेले असता घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. प्रात: विधी आटोपून आल्यावर ही घटना उजेडात आली.
रोकडसह मोबाईल चोरी
लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून कपटात ठेवलेली एक लाख ५० हजारांची रोकड व जवळील कॉटवर ठेवलेले ५-५ हजार रुपयाचे दोन मोबाईल चोरट्याने लांबविला.
अनर्थ टळला
चोरट्याकडून चोरीचा प्रयत्न सुरू असताना परिवारातील सदस्य समोर आले असते तर आरोपी व त्यांच्या झटापट होऊन दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र अनर्थ टळला.
पोलीस दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील कुर्‍हाडे व फौजदार एन.बी.सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळाचा पंचनामा केला.
याबाबात नाथाणी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास फौजदार सूर्यवंशी करित आहे.

मुक्ताईनगरात चोरी
शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २१ रोजी साकाळी ८ वाजता मुक्ताईनगर भागातील रहिवाशी जयंत रामदास पेठकर यांच्या बंद घरातून ३४ हजार रुपयांची चोरी झाली होती.
अपार्टमेंटमध्ये चोरी
२२ रोजी दंगलग्रस्त कॉलनीतील अशोक अपार्टमेंटमधील रहिवाशी जरीना बोहरा यांच्या बंद घरात दुपारी तीनवाजे दरम्यान सव्वा लाखाची चोरी झाली होती. याच अपार्टमेंटमधील डी.एस. कुलकर्णी यांच्या घरात वर्षभरापूर्वी चोरीची घटना घडली होती.
नागरिकामध्ये दहशत
शहरातील वढत्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नारिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.शहरात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: 1 lakh 60 thousand stolen in Sindhi colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.