बॅचलरसाठी 1 नंबर, हाऊस वाइफसाठी 14, तर घर जावयासाठी 7; बिहारमध्ये नातेवाईक आता नंबरनं ओळखले जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 03:15 PM2023-04-07T15:15:23+5:302023-04-07T15:15:57+5:30

बिहारमध्ये नातेवाईकांसह विविध जाती आणि वर्गांसाठी कोड बनवले गेले आहेत (Bihar Caste/Relatives Code) याच माध्यमातून आता विविध वर्गातील लोकांची ओळख एका विशेष कोडद्वारे केली जाणार आहे.

1 number for bachelor 14 for house wife 7 for son in law Relatives in Bihar will now be known by numbers | बॅचलरसाठी 1 नंबर, हाऊस वाइफसाठी 14, तर घर जावयासाठी 7; बिहारमध्ये नातेवाईक आता नंबरनं ओळखले जाणार!

बॅचलरसाठी 1 नंबर, हाऊस वाइफसाठी 14, तर घर जावयासाठी 7; बिहारमध्ये नातेवाईक आता नंबरनं ओळखले जाणार!

googlenewsNext

पाटणा-

बिहारमध्ये नातेवाईकांसह विविध जाती आणि वर्गांसाठी कोड बनवले गेले आहेत (Bihar Caste/Relatives Code) याच माध्यमातून आता विविध वर्गातील लोकांची ओळख एका विशेष कोडद्वारे केली जाणार आहे. वास्तविक बिहारमध्ये जातीच्या आधारावरील जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, तर दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. जात जनगणनेबाबत बिहारमध्ये प्रत्येक जातीची संहिता ठरवण्यात आली आहे. यासोबतच नातेवाइक, शिक्षण, धर्म, व्यवसाय, लॅपटॉप आणि वाहने अशा विविध श्रेणींसाठी कोडही निश्चित करण्यात आले आहेत. या संहितांनुसार, आता बिहारमधील बॅचलरसाठी १ क्रमांक (Code For Bachelors) कोड निश्चित करण्यात आला आहे, तर गृहिणींसाठी १४ क्रमांकाचा कोड करण्यात आला आहे, तर सून आणि घर जावयासाठी आता ७ आकडा निश्चित करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सासू आणि सासऱ्यांसाठी कोड क्रमांक ९, विवाहितांसाठी कोड १ आणि घटस्फोटितांसाठी कोड ५ निर्धारित करण्यात आला आहे. यासोबतच मुलगा-मुलगीसाठी ३, नातवंडांसाठी ४ क्रमांकाचा कोड निश्चित करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी कोड क्रमांक १३ असेल. याशिवाय पुरुष सदस्यांसाठी कोड क्रमांक १, महिलांसाठी कोड २ आणि इतरांसाठी कोड ३ निश्चित करण्यात आला आहे. तर कुटुंब प्रमुखासाठी १ क्रमांक कोड आणि पती-पत्नीसाठी २ क्रमांक प्रविष्ट केला जाईल.

बिहारमध्ये यावेळी होत असलेल्या जात जनगणनेसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या संहितेतही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन संहितेनुसार आता कायस्थांचा नवा कोड २१, कुर्मी-२४, कोईरी-२६, रविदास-६०, ब्राह्मण-१२६, भूमिहार-१४२, यादव-१६५, राजपूत-१६९ आणि शेख-१८१ असे ओळखले जाणार आहेत. जात संहिता-206 मध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. त्यात शिंपी (हिंदू) आडनाव श्रीवास्तव/लाला/लाल/शिंपी नोंदणीकृत होतं, ते काढून फक्त शिंपी (हिंदू) करण्यात आलं आहे. यासोबतच तृतीय पंथीयांसाठीही जात गणनेतही मोठा बदल झाला असून त्यांच्यासाठी कोड २२ निश्चित करण्यात आला आहे.

तृतीय पंथीयांसाठीही कोड निश्चित
खरंतर, शेकडो वर्षांपासून किन्नर, कोठी, ट्रान्सजेंडर…तेव्हा तृतीय लिंग म्हणून स्वीकारले गेले. आतापर्यंत बिहारमध्येही हीच मान्यता होती. परंतु, १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जात जनगणनेत तृतीय लिंगाची जात म्हणून नोंद केली जाणार आहे. १५ एप्रिलपासून एकूण २१४ प्रकारच्या जातींची मोजणी करावयाची आहे. तर २१५ हा क्रमांक जात नसलेल्यांसाठी आहे.

Web Title: 1 number for bachelor 14 for house wife 7 for son in law Relatives in Bihar will now be known by numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार