1 हजारची नोट सध्या बाजारात येणार नाही- जेटली

By admin | Published: November 17, 2016 03:40 PM2016-11-17T15:40:13+5:302016-11-17T15:43:42+5:30

1 हजारची नोट बाजारात आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली

1 thousand notes will not be available in the market right now - Jaitley | 1 हजारची नोट सध्या बाजारात येणार नाही- जेटली

1 हजारची नोट सध्या बाजारात येणार नाही- जेटली

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - 1 हजारची नोट बाजारात आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातली असली तरी बाजारात 2 हजारांची नोट उपलब्ध करून दिली आहे. तसेच पैशाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आम्ही ग्राहकांना 4500 रुपये काढण्याची मर्यादा ठेवली आहे, असंही अरुण जेटली म्हणाले आहेत.

2000च्या नोटा काढण्यासाठी जवळपास आज दिवसभरात 22,500 एटीएम मशिन्स अद्ययावत करण्यात येणार आहेत. तसेच केंद्र सरकारनं लग्न समारंभासाठी बँकेतून 2.50 लाख काढण्याची व्यवस्थाही केली आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला बँकेत पॅनकार्ड आणि स्वतःची वैयक्तिक माहिती द्यावी लागणार आहे, अशी माहिती अलिकडेच आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी दिली आहे.

दुसरीकडे शेतक-यांना पीक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्ड असल्यास प्रत्येक आठवड्याला 25000 हजार रुपये बँकेतून काढता येणार आहे. तर चेकनं शेतक-यांना प्रत्येक आठवड्याला 25000 हजार काढता येणार आहेत. त्यामुळे शेतक-यांना एका आठवड्यात जवळपास 50 हजार बँकेतून काढता येणार आहेत.

Web Title: 1 thousand notes will not be available in the market right now - Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.