१०... भिवापूर... निवडणूक

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:29+5:302015-07-10T23:13:29+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर

10 ... Bhivapur ... election | १०... भिवापूर... निवडणूक

१०... भिवापूर... निवडणूक

Next
षी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर
मोर्चेबांधणीला सुरुवात : अंतर्गत गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठींना फु टला घाम
भिवापूर : भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर करण्यात आली असून, निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच अंतर्गत गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठींना घाम फु टला आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये सभापतिपदावरून कलह सुरू झाला आहे.
या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ ९ मे रोजी संपुष्टात आला. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश भोसले यांनी दिली. या बाजार समितीसाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, बुधवारपासून (दि. ८) नामनिर्देशनपत्रांची विक्री सुरू करण्यात आली आहे. एकूण १८ संचालकांसाठी होणार असलेल्या या निवडणुकीत १ हजार ७ मतदार मतदानाचा अधिकार बजावतील.
नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ जुलै असून, नामनिर्देशन अर्जाची छाननी २४ जुलै रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट असून, १४ ऑगस्ट रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. त्यानंतर रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, ३१ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश भोसले यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश भजने व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशचंद्र अवचट जबाबदारी सांभाळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
-------
----------चौकट---
मतदारसंघनिहाय जागा व मतदार
सेवा सहकारी संस्था गटातून ११ संचालक निवडून द्यावयाचे असून, या गटात ३४१ मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून चार संचालक निवडून येणार असून, ४२० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. व्यापारी व अडते मतदारसंघातून दोन संचालकांना निवडून द्यावयाचे आहे. या मतदारसंघाची मतदारसंख्या १२१ आहे. हमाल व तोलारी गटातून एक संचालक निवडून येणार असून, त्याला १२५ मतदार मतदान करतील.
***

Web Title: 10 ... Bhivapur ... election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.