अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात १० विधेयके मंजूर
By admin | Published: March 17, 2016 02:12 PM2016-03-17T14:12:39+5:302016-03-17T14:12:39+5:30
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा बुधवारी संध्याकाळी संपला. संसदेची दोन्ही सभागृह २५ एप्रिलपर्यंत ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा बुधवारी संध्याकाळी संपला. संसदेची दोन्ही सभागृह २५ एप्रिलपर्यंत ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. अधिवेशनाचा पहिला टप्पा सकारात्मक ठरला. २३ फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात संसदेने १० विधेयके मंजूर केली. लोकसभेने नऊ विधेयके मंजूर केली तर, राज्यसभेने ११ विधेयके पास केली.
तीन वर्षात परदेश दौ-यांवर १५०० कोटी खर्च - सरकार
मागच्या तीन वर्षात सरकारच्या विविध मंत्रालयांनी परदेश दौ-यांवर १५०० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेला दिली. जानेवारीपासून झालेल्या नव्या नियमानुसार एकावर्षात अधिकारी चारपेक्षा जास्त परदेश दौरे करु शकत नाही तसेच हे दौरे पाच दिवसांपेक्षा जास्त असू नयेत.