जन-धन योजनेंतर्गत १० कोटी बँक खाती
By admin | Published: December 30, 2014 01:10 AM2014-12-30T01:10:14+5:302014-12-30T01:10:14+5:30
बँकांनी पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत १० कोटी खाती उघडली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सरकारने हे लक्ष्य गाठण्यासाठी २६ जानेवारीची मुदत निश्चित केली होती.
नवी दिल्ली : बँकांनी पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत १० कोटी खाती उघडली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सरकारने हे लक्ष्य गाठण्यासाठी २६ जानेवारीची मुदत निश्चित केली होती. बँकांना महिनाभरातच हे लक्ष्य गाठण्यात यश आले आहे.
एका अधिकृत निवेदनानुसार, २६ डिसेंबरपर्यंत जन-धन योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यांची संख्या १०.०८ कोटी होती. बँकांनी २२ डिसेंबरपर्यंत ७.२८ कोटी रुपे कार्ड वितरित केले होते.
च्‘बँक आणि एलआयसी यांना दावा अर्ज आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. एलआयसीला दावा मिळाल्यानंतर १५ दिवसांत त्याचा निपटारा करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले,’ असे निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही दाव्याच्या निपटाऱ्यासाठी ३० दिवसांहून अधिक वेळ लागता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले.