१० कोटींच्या कामांचे आदेश प्राप्त नितीन बरडे: कामे मनपा यंत्रणा निगराणीखाली

By Admin | Published: August 25, 2016 10:39 PM2016-08-25T22:39:12+5:302016-08-25T22:39:12+5:30

जळगाव : विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळालेल्या १०० कामांच्या यादीतील १० कोटींच्या कामांबाबतचे आदेश प्राप्त झाले असून येत्या तीन दिवसात त्याची निविदा प्रक्रिया केली जाईल अशी माहिती स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

10 crores of orders have been issued for work: Nitin Badde: Under the supervision of Municipal Corporation Machinery | १० कोटींच्या कामांचे आदेश प्राप्त नितीन बरडे: कामे मनपा यंत्रणा निगराणीखाली

१० कोटींच्या कामांचे आदेश प्राप्त नितीन बरडे: कामे मनपा यंत्रणा निगराणीखाली

googlenewsNext
गाव : विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळालेल्या १०० कामांच्या यादीतील १० कोटींच्या कामांबाबतचे आदेश प्राप्त झाले असून येत्या तीन दिवसात त्याची निविदा प्रक्रिया केली जाईल अशी माहिती स्थायी समितीचे सभापती नितीन बरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निधीतील पाच कोटी व पाच कोटींचा शासन निधी अशा १० कोटींच्या निधीतून शहरातील ३७ पैकी ३३ प्रभागांमध्ये १०० कामे महापालिकेने प्रस्तावित केली आहेत. या कामांची यादी करून मंजुरीसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीने गेल्या आठवड्यात नाशिक येथे झालेल्या बैठकीत या कामांना मंजुरी दिली. त्या संदर्भातील आदेश प्राप्त झाले असल्याचे बरडे यांनी सांगितले.
कामे मनपा मार्फतच
कामांना मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्याने आता येत्या तीन दिवसात कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार असून दिवाळपर्यंत कामे सुरू होणार आहेत. ही सर्व कामे महापालिकेच्या यंत्रणेच्या निगराणीखालीच होतील. केवळ आमदार निधीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहेत. मात्र त्यासाठीच्या प्रक्रियेत कालापव्यय जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
कामे होणार नसलेले चार प्रभाग
कामे होणार्‍या नसलेल्या चार प्रभागांमध्ये प्रमाग क्रमांक ८, १९, २९ व ९ चा समावेश आहे. प्रभाग आठ हा महापौर नितीन ल‹ा, प्रभाग १९ सीमा भोळे, २९ ज्योती चव्हाण, व ९ शामकांत सोनवणे यांचा आहे. मात्र या भागात अगोदरच बरीच कामे झाली असल्याने त्यांना वगळण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा वॉर्डातही कामे
भाजपाचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्येही सुमारे १ कोटी २६ लाखांची कामे असून मनसे, राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या प्रभागांमध्येही ही विकास कामे होणार आहेत. मंजूर कामांमध्ये २० लाखापर्यंतची कामे बहुतांश नगरसेवकांच्या वॉर्डात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही होणार कामे
मंजूर शंभर कामांमध्ये अंतर्गत रस्ते, गटारी, कल्व्हर्ट, गटारींवरील ढापे, डांबरी व कॉँक्रीटच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.

Web Title: 10 crores of orders have been issued for work: Nitin Badde: Under the supervision of Municipal Corporation Machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.