दुर्दैवी! पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विसर्जनावेळी पाण्यात बुडून १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:56 AM2022-10-06T09:56:28+5:302022-10-06T10:01:08+5:30

काल विजयादशमी दिवशी पश्चिम बंगालमध्ये दुर्गामाता मूर्ती विसर्जनावेळी जलपाईगुडी नदीत १० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

10 dead after flash flood hit Mal River in West Bengal's Jalpaiguri during idol immersion | दुर्दैवी! पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विसर्जनावेळी पाण्यात बुडून १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

दुर्दैवी! पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विसर्जनावेळी पाण्यात बुडून १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Next

कोलकाता : काल विजयादशमी दिवशी पश्चिम बंगालमध्ये दुर्गामाता मूर्ती विसर्जनावेळी जलपाईगुडी नदीत १० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात अनेकजण बेपत्ता आहेत, शोध मोहिम अजुनही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये काल मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे अचानक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. 

काल रात्री मूर्ती विसर्जनासाठी जलपाईगुडी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यावेळी मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या अनेकांचा बुडून मृत्यू झाला. तर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ तसेच पोलिसांनी मदत मोहिम सुरू केली.

मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी, प्रतापराव जाधवांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच ५० जणांना वाचवले आहे. अजुनही मदतकार्य सुरू आहे, अशी माहिती जलपाईगुडी जिल्हा दंडाधिकारी मोमिता गोद्रा यांनी दिली.

काल रात्री ८.३० वाजता अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाण्याचा प्रवाह एवढा होती काही क्षणातच अनेकजण बुडाले. बचावासाठी आरडाओरडा झाला.यावेळी नदी पात्राजवळ ५० हून अधिक लोक होते.

अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पाण्याच्या प्रवाहात काही समजण्यापूर्वीच अनेक जण वाहून गेले.  

Web Title: 10 dead after flash flood hit Mal River in West Bengal's Jalpaiguri during idol immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.