आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक केल्यास १0 टक्के सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:58 AM2018-09-05T01:58:46+5:302018-09-05T01:59:16+5:30

तुम्ही जर नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करीत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवरून अथवा अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास तिकीट दरात १0 टक्के सवलत मिळणार आहे.

10% discount on booking tickets from IRCTC website | आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक केल्यास १0 टक्के सूट

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक केल्यास १0 टक्के सूट

Next

नवी दिल्ली : तुम्ही जर नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करीत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवरून अथवा अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यास तिकीट दरात १0 टक्के सवलत मिळणार आहे. ‘आयआरसीटीसी डॉट को डॉट इन’ (irctc.co.in), असे या वेबसाइटचे नाव आहे. ही वेबसाइट अथवा आयआयसीटीसी अ‍ॅपवरून तिकीट बुक करताना पेटीएम अथवा मोबीक्विकद्वारे पैसे अदा केल्यानंतर ही सवलत मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या हंगामात मोबीक्विक रेल्वे तिकीट खरेदीवर १0 टक्के सवलत देणार आहे. आयआरसीटीसी अ‍ॅप अथवा वेबसाइटवरून तिकीट खरेदी केलेल्या तिकिटाचे पैसे मोबीक्विक अ‍ॅपद्वारे दिल्यास ही सवलत मिळेल. याशिवाय पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक केल्यास १00 रुपयांचा रोख परतावा (कॅशबॅक) देऊ केला आहे. फ्लिपकार्टच्या ‘फोनपे’नेही १00 रुपयांचा रोख परतावा देऊ केला आहे. फोनपेवरून पैसे भरल्यास पहिल्या दोन व्यवहारांवर प्रत्येकी ५0 रुपयांचा रोख परतावा मिळणार आहे.
या सवलतीचा रेल्वेला लाभ होईल. त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंट व्यवहार करणाऱ्या कंपन्यांनाही ग्राहक मिळतील. डिजिटल वित्तीय व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळेल. अशा प्रकारे नव्या पर्यटन हंगामात ही योजना सर्व हितधारकांना लाभदायक ठरणार आहे, असे रेल्वे अधिकाºयाने सांगितले.

अशी मिळवा सवलत
-आयआरसीटीसी डॉट को डॉट ईन (irctc.co.in ) या वेबसाइटवर अथवा आयआरसीटीसी अ‍ॅपवर जा.
-आपला युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
-आपल्या प्रवासाचा तपशील भरा.

-कॅप्टशा कोड (captcha code) भरा आणि पेमेंट करण्यासाठी प्रोसीड बटनवर क्लिक करा.
-पेमेंट मोडपैकी ई-वॉलेट पर्यायाची निवड करा.
-वॉलेट वर्गवारीतील पेटीएम, फ्रीचार्ज अथवा मोबीक्विक यापैकी एका पर्यायाची निवड करा.

Web Title: 10% discount on booking tickets from IRCTC website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.