पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलासाठी १० टक्के सवलतीची योजना
By admin | Published: April 10, 2015 11:29 PM2015-04-10T23:29:59+5:302015-04-10T23:29:59+5:30
कृषी समिती बैठक : महावितरणचा निर्णय
Next
क षी समिती बैठक : महावितरणचा निर्णयनाशिक : पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकीत असल्यास थकीत रकमेच्या एकूण १० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम १५ समान हप्त्यात वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनीने घेतल्याची माहिती विभागाच्या अधिकार्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत दिली.सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत कृषी समितीची मासिक बैठक काल (दि.१०) झाली. बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समिती स्तरावर माल साठवणूक करण्यासाठी जि.प. मालकीचे गुदाम बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेस प्रस्ताव सादर करण्याबाबत सभापतींनी सूचना दिल्या. आत्मा प्रकल्पांतर्गत एकूण ६०३ कांदाचाळींचे चार कोटी ६३ लाख इतके अनुदान वाटप करण्यात आल्याबाबतची माहिती सदस्यांना आत्मा प्रकल्पाच्या अधिकार्यांनी दिली. महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी थकीत पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांबाबत नवीन शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती दिली. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सिंगल फेज योजना बंद झाल्याबाबत व दीनदयाळ योजनेंतर्गत गावठाण फिडर योजना चालू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीग्रस्त योजनंेतर्गत सुरगाणा तालुक्यातील सहा लाभार्थ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश सभापती केदा अहेर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यात आनंदी राऊत-२५ हजार, लक्ष्मण बढाले-२२ हजार ५००, विठ्ठल भोये- २५ हजार, रघुनाथ कडू - २५ हजार, अंबादास बागू-२० हजार, दत्तू बागुल-२५ हजार आदिंना एकूण १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. बैठकीस सदस्य केरू पवार, सुभाष चौधरी, श्रीमती भावना भंडारी, श्रीमती रंजना पवार, सुनील चव्हाण, मनीषा बोडके, संपतराव सकाळे, अर्जुन बोराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)