रवींद्रनाथ टागोरांची 10 वैशिष्ट्ये, त्यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त

By admin | Published: May 7, 2016 11:58 AM2016-05-07T11:58:36+5:302016-05-07T11:58:36+5:30

आज रवींद्रनाथ टागोरांची 155वी जयंती. यानिमित्त टागोरांच्या 10 वैशिष्ट्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करूया.

10 Features of Rabindranath Tagore, on the occasion of their 155th birth anniversary | रवींद्रनाथ टागोरांची 10 वैशिष्ट्ये, त्यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त

रवींद्रनाथ टागोरांची 10 वैशिष्ट्ये, त्यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त

Next
>- 7 मे 1961 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोरांना 1913मध्ये साहित्याचं नोबेल मिळालं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय.
- दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिणारे तेच एकमेव. भारताचं जन गण मन व बांग्लादेशचं आमार सोनार बांगला, त्यांच्याच लेखणीतून उतरलं.
- सुटीमध्ये रवीद्रनाथ टागोरांना हिमालयात जायला आवडायचं.
- आठव्या वर्षापासून कविता करण्याचा रवींद्रनाथांना छंद लागला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा भानूसिंह हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.
- 13 भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या रवींग्रनाथांना शाळेत जाण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्यांचं सगळं शिक्षण वडीलबंधू हेमेंद्रनाथ यांनी घरातच केलं.
- रवींद्रनाथ टागोरांना ब्रिटिश सरकारनं नाईटहूड हा किताब दिला होता, परंतु ब्रिटिशांच्या भारतातल्या धोरणांचा निषेध म्हणून त्यांनी तो परत केला.
- टागोरांना फिरण्याची प्रचंड आवड होती, त्यातून त्यांनी समाज, राजकारण अशा विविध अंगांचा अभ्यास केला.
- वयाच्या साठाव्या वर्षी टागोरांनी चित्रकलेस आरंभ केला आणि नंतर त्यातही प्रावीण्य मिळवलं. त्याच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने झाली.
- मोहनदास करमचंद गांधींना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
- टागोर आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांना एकमेकांबद्दल अपार आदर होता, आणि त्यांच्यामधलं संभाषण प्रसिद्ध झाल्यावर खूप गाजलं होतं.

Web Title: 10 Features of Rabindranath Tagore, on the occasion of their 155th birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.