हिमवर्षावात सापडलेले १० जवान शहीद - संरक्षण मंत्रालय
By admin | Published: February 4, 2016 05:37 PM2016-02-04T17:37:10+5:302016-02-04T17:43:59+5:30
सियाचेनमध्ये हिमवर्षावात सापडल्यावर बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे १० जवान शहीद झाल्याचे संरक्षण खात्याने म्हटले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - सियाचेनमध्ये हिमवर्षावात सापडल्यावर बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे १० जवान शहीद झाल्याचे संरक्षण खात्याने म्हटले आहे.
काल हे १० जवान गस्तीसाठी असलेल्या चौकीला काल सकाळी हिमवर्षावाने झोडपले, आणि एका फटक्यात ते बेपत्ता झाले. अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेनंतर त्यांची वाचण्याची शक्यता धूसर असल्याचे खेदाने सांगायला लागत आहे, असे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
मद्रास बटालियनचे ९ जवान आणि ज्युनिअर कमिशन ऑफिसर अशा दहा जणांचा वायुदलाची विमाने शोध घेत आहेत. हा अपघात १९,६०० फूट उंचीच्या नॉर्दर्न ग्लेशियर येथे घडला.
हिमवर्षावाखाली गाडले गेल्यामुळे या जवानांशी असलेला रेडियो संपर्क तुटला आणि या घटनेची माहिती समजली. अत्यंत जोखमीचा हा भाग असून जवळपास २२००० फूट उंचीवर भारतीय लष्कराची प्रसिद्ध अशी बाना चौकी आहे.