सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा
By admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:08+5:302017-03-23T17:18:08+5:30
जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.
Next
ज गाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा येथील सोमाणी व्यापारी संकुलात साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भामरे हे सोने, चांदी घडविण्याचे तसेच खरेदी-विक्रीचे काम करतात. ऑर्डरप्रमाणे दागिने घडविण्याचेही काम करतात. सुशांता सुनील कुंडू (रा.चुनाबाटी, ता.शिवपुर, जि.हावडा, पिम बंगला) व राकेश अनंत अधिकारी (रा.धुलेकुंडू जि.हुगळी, पिम बंगाल) दोन्ही.ह.मु.सिताराम प्लाझा, मारोती पेठ, जगताप मंगल कार्यालयासमोर जळगाव या दागिने घडविणार्या कारागिरांशी त्यांची ९ वर्षापासून ओळख होती. त्यातून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले होते. २२ फेब्रुवारी रोजी भामरे यांच्याकडे दागिने घडविण्याची ऑर्डर आली. त्यामुळे भामरे यांनी राकेश व सुशांता या दोघांना त्यादिवशी दुकानात बोलावून घेतले व ईअर रिंग ३ ग्रॅम ५३ जोडी, मंगळसूत्र पोत पेंडलसह ३५ ग्रॅमप्रमाणे २ नग व मंगळसूत्र वाटी २ ग्रॅम जोडी प्रमाणे ६० नग अशी ऑर्डर दिली. त्यासाठी ३५० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट या दोघांच्या ताब्यात दिले. यावेळी बंगाली समाजाचे सोनार भिकुराम संत्रा हे देखील उपस्थित होते.बिस्कीट मिळताच ठोकली धूमसोन्याचे बिस्कीट मिळताच सुशांता व राकेश या दोघांनी जळगावातून धूम ठोकली. ऑर्डर घेतांना या दोघांनी भामरे यांना ४ ते ५ दिवसात सोने बनवून देतो असे सांगितले होते, त्यानुसार भामरे यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता दोघांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी भामरे गेले, मात्र तेथील सहकार्यांनी सुशांता व राकेश हे दोन्ही जण कोणालाच काहीही न सांगता बाहेरगावी गेल्याचे समजले.हे ऐकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भामरे यांनी दोघांचा परिसरात शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.