११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 02:23 AM2020-09-29T02:23:27+5:302020-09-29T02:23:41+5:30

५० लाख जण झाले बरे : देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर

10 lakh new patients in 11 days, number of corona patients in the country over 60 lakh | ११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर

११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर

Next

नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोनाचे ८२,१७० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ६० लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या ११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या आता ५० लाख १६ हजारांवर पोहोचली आहे.
सध्या देशात ९,६२,६४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णाच्या तुलनेत हे प्रमाण १५.८५ टक्के आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८२.५८ टक्के आहे, तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५७ टक्के इतका कमी आहे.

सर्वाधिक संख्या असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेमध्ये ७३ लाख २१ हजार रुग्ण आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेतील रुग्णांपेक्षा १३ लाखांनी कमी आहे.

जगात कोरोना बळींची संख्या १० लाखांहून अधिक

प्रचंड हानी; एकूण रुग्ण ३ कोटी ३० लाखांवर

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे, तर या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३० लाखांहून अधिक झाली आहे.
आठ-नऊ महिन्यांपूर्वी चीनमधील वुहान शहरात सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीनंतर अल्पावधीतच साºया जगाला ग्रासले. या संसर्गावर सध्या कोणतेच रामबाण औषध अस्तित्वात नाही. त्यामुळे बळींची संख्याही वाढते आहे. जगात कोरोनाचे सर्वाधिक बळी अमेरिकेत असून, त्यांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. त्यानंतर बळींची संख्या ब्राझीलमध्ये १ लाख ४१ हजार, भारतामध्ये ९५,५४२, मेक्सिकोत ७६,४३०, ब्रिटनमध्ये ४१,९८८ इतकी आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले असून, काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला आहे.
एप्रिल महिन्यापासून जगभरातील सुमारे ४ अब्ज लोकांना लॉकडाऊनमध्ये राहावे लागले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार थोडा कमी झाला होता. मात्र, निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर या संसर्गाचा फैलाव पुन्हा वाढला.

युरोप : बिकट स्थिती
कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत युरोपचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता दुसºया लाटेमध्ये पॅरिस, लंडन, माद्रिद आदी शहरांतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा निर्बंध लादले जात आहेत. जगातील सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न न केल्यास बळींची संख्या काही महिन्यांत २० लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती आहे.

Web Title: 10 lakh new patients in 11 days, number of corona patients in the country over 60 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.