बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरण- संशयीताची माहिती देणाऱ्यास १० लाखांचं बक्षिस; एनआयएची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:49 PM2024-03-06T15:49:14+5:302024-03-06T15:53:27+5:30
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे या हॉटेलमध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात ९ जण जखमी झाले असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही.
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे या हॉटेलमध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात ९ जण जखमी झाले असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. आता या प्रकरणी एनआयने तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणी एनआयएन मोठी अपडेट दिली आहे.
बंगळुरु येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास १० लाखांच बक्षिस एनआयएने जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असेही एनआयएने म्हटले आहे.
एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात असी माहिती समोर आली आहे की, बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये कैद असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी टी नाझीर हिंसक कारवाया करण्यासाठी कैद्यांना कट्टरतावादाचे धडे देत होता. बंगळुरू शहर पोलिसांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सात पिस्तूल, चार हातबॉम्ब, एक मॅगझिन, 45 जिवंत काडतुसे आणि चार वॉकी-टॉकी जप्त केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
NIA announces a cash reward of Rs. 10 lakh for information about the bomber in the Rameshwaram Cafe blast case of Bengaluru. Informant's identity will be kept confidential: NIA pic.twitter.com/NY5PPnELKE
— ANI (@ANI) March 6, 2024