मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 10:09 IST2025-02-16T10:04:45+5:302025-02-16T10:09:59+5:30

New delhi railway station stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊ मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली आहे. 

10 lakhs to the heirs of the deceased, 2.5 lakhs to the injured; Central government announces assistance | मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा

मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा

Delhi stampede today: नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. असंख्य प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना आणि जखमींना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, तर जखमींना अडीच लाख, तर किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. 

"दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी दुःखी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. संपूर्ण टीम त्या व्यक्तींना मदत करण्यासाठी काम करत आहे, ज्यांना या घटनेमुळे नुकसान झाले आहे", असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. 

मृतांच्या कुटुंबीयांना मदत 

केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या चेंगराचेंगरीत जे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे, तर किरकोळ जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे. 

दिल्ली रेल्वे स्थानक चेंगराचेंगरी: मृत व्यक्तींची नावे

आहा देवी (वय ७९ वर्ष, बिहार)

पिंकी देवी (वय ४१ वर्ष, दिल्ली)

शीला देवी (वय ५० वर्ष, दिल्ली)

व्योम (वय २५ वर्ष, दिल्ली)

पूनम देवी (वय ४० वर्ष, बिहार)

ललिता देवी (वय ३५ वर्ष, बिहार)

सुरूची पुत्री (वय ११ वर्ष, बिहार)

कृष्णा देवी (वय ४० वर्ष, बिहार)

विजय साह (वय १५ वर्ष, बिहार)

नीरज (वय १२ वर्ष, बिहार)

शांती देवी (वय ४० वर्ष, बिहार)

पूजा कुमार (वय ८ वर्ष, बिहार)

संगीता मलिक (वय ३४ वर्ष, हरयाणा)

पूनम वीरेंद्र सिंह (वय ३४ वर्ष, दिल्ली)

ममता झा (वय ४० वर्ष, दिल्ली)

रिया सिंह (वय ७ वर्ष, दिल्ली)

बेबी कुमारी (वय २४ वर्ष, दिल्ली)

मनोज कुशवाह (वय ४७ वर्ष, दिल्ली)

उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर पटनाला जाणारी मगध एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर जम्मूला जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस उभी होती. त्याचदरम्यान, महाकुंभ निमित्ताने प्रयागराज एक्स्प्रेस ही विशेष गाडी जाणार होती. 

ही गाडी आधी प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर येणार अशी उद्घोषणा करण्यात आली. मात्र, नंतर प्रयागराज एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येणार अशी उद्घोषणा झाली आणि त्यानंतर लोकांची धावपळ सुरू झाली. यात जिन्यावरून उतरताना काही जण पाय घसरून पडले आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. 

Web Title: 10 lakhs to the heirs of the deceased, 2.5 lakhs to the injured; Central government announces assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.