हरयाणा मंत्रिमंडळाचा विस्तार, 10 मंत्र्यांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:49 PM2019-11-14T13:49:41+5:302019-11-14T14:08:42+5:30
माजी हॉकी खेळाडू संदीप सिंह यांनीही राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पदाची शपथ घेतली आहे.
चंदिगड : हरयाणामध्ये भाजपा-जननायक जनता पार्टीच्या सरकारकडून आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. गुरुवारी 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या कोट्यातून आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर जेजपीच्या एका आमदाराने आणि अपक्ष असलेल्या एक आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली.
या दहा मंत्र्यांमध्ये आधीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले अनिल विज यांचे सुद्धा नाव आहे. याशिवाय, कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रंजीत सिंह, जेपी दलाल, बनवारी लाल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर ओम प्रकाश यादव, कमलेश ढांडा, अनुप धानक आणि माजी हॉकी खेळाडू संदीप सिंह यांनीही राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पदाची शपथ घेतली आहे.
Haryana: Anil Vij, Kanwar Pal, Sandeep Singh and 7 other ministers took oath as new ministers of the state cabinet today. pic.twitter.com/rm7mBIhM9Q
— ANI (@ANI) November 14, 2019
दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत दिवाळीच्या मुहूर्तावर सत्ता स्थापन केली. त्यावेळी सगल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपाचे नेते मनोहर लाल खट्टर यांनी घेतली होती. तसेच जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
(भाजपाशी केली युती अन् वडिलांना मिळाली संचित रजा!)
(जेजेपीनं जनमताच्या कौलाचा अपमान केलाय - भूपिंदर सिंह हुड्डा)