प्रवास सुखकर होणार, आजपासून 10 नवीन 'सेवा सर्व्हिस' ट्रेन्स धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:31 AM2019-10-15T10:31:03+5:302019-10-15T10:34:01+5:30
रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने आजपासून 10 नवीन ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने आजपासून 10 नवीन ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. या ट्रेन्सना 'सेवा सर्व्हिस' ट्रेन्स असं नाव देण्यात आलं आहे. मंगळवारी (15 ऑक्टोबर) रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या सर्व ट्रेन्स या पॅसेंजर ट्रेन्स आहेत.
'सेवा सर्व्हिस' ट्रेन्समधील काही ट्रेन्स या दररोज तर काही ट्रेन्स आठवड्यातून सहा वेळा चालवण्यात येणार आहेत. दिल्ली आणि शामली, भुवनेश्वर आणि नारायणगड शहर, मुरकंगसेलेक आणि डिब्रूगड, कोटा आणि झालावाड, कोयंबत्तूर आणि पलानी दरम्यान रोज ट्रेन धावणार आहेत. वडनगर आणि महेसाणा, असारवा आणि हिंमतनगर, करूर आणि सलेम, यशवंतपूर आणि तुमुकूर, कोयंबत्तूर आणि पोल्लाची दरम्यान आठवड्यातून सहा वेळा ट्रेन्स चालवण्यात येणार आहे.
10 'Seva Service' trains will be flagged off on 15th October, 2019 by Hon’ble MR @PiyushGoyal. These trains will benefit the commuters in establishing connectivity between the small towns of the country with major cities. pic.twitter.com/oxiLgxh1Ji
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 12, 2019
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजता रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते 10 नविन सर्व्हिस ट्रेन्सचं उद्धाटन करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे एक नवीन वेळापत्रक तयार करणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दिल्ली आणि शामली दरम्यान एक नवीन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली जंक्शनवरून सकाळी 8.40 मिनिटाला सुटेल तर सकाळी 11.50 मिनिटाला ती शामली येथे पोहचणार आहे. नवीन ट्रेन्समुळे प्रवाशांना प्रवास करणं अधिक सोपं जाणार आहे.
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 'या' 30 ट्रेन्स रद्द
सुट्टीच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर एकदा रेल्वेचं वेळापत्रक नक्की पाहा. कारण रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. हरिद्वार आणि लक्सर रेल्वे ट्रॅकवर काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाचे काम लवकर व्हावे यासाठी या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेने 30 ट्रेन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाला ते हरिद्वार जाणाऱ्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसणार आहे. मात्र रुळाचे काम पूर्ण झाल्यावर या रेल्वे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहेत. मुरादाबाद विभागामार्फत हरिद्वार ते लक्सर दरम्यान रेल्वेरुळाचे डबल करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंबालाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी हरी मोहन यांनी दिली आहे.