राजस्थानमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:09 AM2019-11-18T10:09:19+5:302019-11-18T10:15:35+5:30

राजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

10 people killed, 20-25 injured in collision between a bus and truck in Bikaner | राजस्थानमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

राजस्थानमध्ये भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

Next
ठळक मुद्देराजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिकानेर - राजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.  

मिळलेल्या माहितीनूसार, बिकानेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 11 जवळ सोमवारी (18 नोव्हेंबर) ट्रक आणि बसची भीषण धडक झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

बिहार येथून राजस्थानला जाणाऱ्या एका प्रवासी बसचा रविवारी भीषण अपघात झाला आहे. कुशीनगर आणि देवरिया जिल्ह्यातील सीमारेषेवरील भुजौली गावानजीक रविवारी रात्री एका प्रवासी बसला अपघात झाला आहे. या बसमधील 81 प्रवाशांपैकी महराजगंज जिल्ह्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, जखमींना गोरखपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सीतामढी येथून जयपूरकडे ही बस जात होती. मात्र, रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमित कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ मदत मिळवून दिली. बसमधील प्रवाशांना टोल प्लाझाच्या सुविधा केंद्रावर शिफ्ट करण्यात आले. त्याठिकाणीच त्यांच्या जेवणाचाही सोय करण्यात आली होती. सोमवारी सकाळी या प्रवाशांना त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी पाठविण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

 

 

Web Title: 10 people killed, 20-25 injured in collision between a bus and truck in Bikaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.