१० जिवंत झाडांची कत्तल दुर्लक्ष : खोटेनगरातील पोलीस कॉलनीतच झाडांवर कुर्हाड
By admin | Published: February 14, 2016 12:42 AM2016-02-14T00:42:17+5:302016-02-14T00:42:17+5:30
सोबत फोटो- १४ सीटीआर १५ व १७
Next
स बत फोटो- १४ सीटीआर १५ व १७जळगाव : शहर व परिसरात वृक्षांची कत्तल वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारे शनिवारी पुन्हा खोटे नगरातील जुन्या पोलीस कॉलनीमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १० जिवंत झाडांची कत्तल करण्यात आली. याकडे वनविभाग व मनपाचेही लक्ष नसल्याने असे प्रकार राजरोसपणे सुरू आहे. आपापल्या सोयीसाठी प्रत्येकजण झाडांची कत्तल करीत असल्याच्या घटना दर आठवड्याला समोर येत आहे. गेल्या आठवड्यात कालिंका देवी मंदिराच्या समोरील भागात, त्या पूर्वी शिरसोली रस्त्यावर एका महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली होती. त्या नंतर आता पुन्हा शनिवारी दुपारी खोटे नगरातील जुन्या पोलीस कॉलनीमध्ये १० झाडे तोडण्यात आली. भींतीच्या कुंपणासाठी झाडांवर कुर्हाड...पोलीस कॉलनीतील एका घराच्या शेजारी ही झाडे तोडण्यात आली असून त्या ठिकाणी भींतीचे कुंपण करायचे असल्याने वृक्ष तोडण्यात येत असल्याचे तेथे सांगण्यात आले. हे झाड आम्हीच लावले असून त्यास परवानगीची गरज काय असा उलट प्रश्न या वेळी करण्यात आला. कत्तल केलेल्या झाडांमध्ये आंबा, बाभूळ या वृक्षांचा समावेश असून यामध्ये तीन ते चार झाडे चांगली मोठी वाढलेली होती तर इतर झाडे त्या खालोखाल होती. जामनेरच्या मजुरांना दिले काम...या ठिकाणी पाहणी केली असता तेथे काही मजुरांमार्फत झाडे तोडण्यात येऊन केवळ खालचे खोड जमिनीत होते तर एका झाडाचे खोड अर्ध्यापर्यंत तोडलेले होते. त्यावेळी मजुरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला या लोकांनीच झाड तोडायची सांगितली. आम्ही जामनेरचे असून त्यांच्या सांगण्यावरून झाड तोडले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खुलेआम वृक्ष तोड झाली तरी त्याकडे वनविभाग अथवा मनपाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे.